बेंदेवाडी शाळेतील शंभर टक्के पदे भरण्याच्या मागणीसाठी पालकांचे आमरण उपोषण...?
बेंदेवाडी शाळेतील 100 टक्के पदे भरण्यात यावीत यासाठी पालकांचे अमरण उपोषण
छत्रपती संभाजीनगर, दि.28 (डि-24 न्यूज) :- जि. प. प्राशा बेंदेवाडी केंद्र शेकटा ता. जि. छत्रपती संभाजीनगर शाळेत विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यास अपुरे शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्याचे शिक्षण रामभरोसे चालू असल्याच्या संतापाने व कायमचे शिक्षक मिळावे यासाठी विद्यार्थी व पालक यांची शाळा जि. प. कार्यालयात भरविण्याचा पालकांनी इशारा जि प प्रशासनास दिलेला आहे .
बेंदेवाडी येथे 1 ते 7 चे वर्ग असुन विद्यार्थी संख्या 118 आहे . पालकांनी स्व निधीतुन शाळेला प्रशस्त जागा, वर्ग खोल्या , वॉलकंपाऊड , पिण्याच्या पाण्याची सुविधा पण करून दिलेली आहे तसेच पालकांनी रंगरंगोटी पण शाळेला करून दिलेली आहे. मागील वर्षी ही शाळा मुख्यमंत्री माझी शाळा समृद्ध शाळा स्पर्धेत तालुक्यातुन अवल क्रमांकावर पण रहिलेली आहे. शाळेत मान्य पदाप्रमाणे शिक्षक नाहीत ते मिळावेत यासाठी मागील वर्षी पण सातत्याने पालकांनी पंचायत समिती कार्यालयाकडे पाठपुरवठा करून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकातून शाळेवर एका महिला शिक्षिकेची प्रतिनियुक्ती करून विद्यार्थ्याची व्यवस्था करून घेतली होती. त्यानंतर शाळेने सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धेत चांगले यश पण प्राप्त केले होते. परंतु संबंधित शिक्षिकेचे शाळेत अत्यंत चांगले काम चालू असताना प्रशासनाने त्यांच्या मुळ शाळेवर दोन जण अतिरिक्त असताना सुद्धा त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करून बेंदेवाडी शाळेस रामभरोसे सोडले. तसेच मागील चार वर्षापासून शाळेत मान्य पदे सहा असताना कार्यरत पदे फक्त तिनच आहे. त्यामुळे मान्य पदाप्रमाणे शिक्षक मिळावेत तसेच शाळेमध्ये मुलींची संख्या जास्त असल्यामुळे त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मागिल वर्षी ज्या महिला शिक्षकांची प्रतिनियुक्ती बेंदेवाडी शाळेवर होती त्यांच्या मुळ शाळेवर अतिरिक्त दोन शिक्षक असल्यामुळे त्यांची कायमची नियुक्ती बेंदेवाडी या ठिकाणी करावी आणि इतर दोन पुरुष शिक्षकामध्ये नेवापुर या शाळेत कार्यरत असणारे ज्यांचे मुळ गाव बेंदेवाडी हे आहे यांची पण कायमची नियुक्ती करण्यात यावी तसेच इतर एका जणांची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी यासाठी बेंदेवाडी शाळेतील मुले व पालक यांची शाळा जि प कार्यालयात भरवून उपोषण करण्याचा इशारा जि. प. शिक्षण विभाग प्रशासनाला दिलेला आहे.
निवेदनावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश नाऱ्हाडे यांच्यासह नारायण बैनाडे , दिनेश शिहिरे , सुरेश उसारे , करणसिंग शेवगण , सुर्वणसिंग राजरवाल , गितेश शिहिरे , संतोष तसेवाल , चत्तरसिंग बैनाडे , दिपक हिवराळे , जिवन काहीटे कांचनाबाई राजपुत, ज्योती बैनाडे , मनिषा नाऱ्हाडे , दिपाली कातुरे , काजल दाभाडे सह शेकडो पालकांच्या स्वाक्षरा आहेत.
What's Your Reaction?