थकीत मालमत्ता करापोटी शाळेचे कार्यालय सिल, मनपा प्रशासनाची धडक कारवाई
थकीत मालमत्ता करापोटी शाळेचे कार्यालय सिल...मनपाची धडक कारवाई...
औरंगाबाद, दि.23(डि-24 न्यूज) प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व उप आयुक्त अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर पालिकेच्या वतीने थकीत मालमत्ता कर व पाणी पट्टी वसुली मोहीम तीव्र स्वरूपात सर्व झोन कार्यालय येथे राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने
आज रोजी वॉर्ड फ सहाय्यक आयुक्त प्रसाद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्र 78 विशालनगर येथे श्री आनंद प्रवीण सोमय्या, वंडर गार्डन प्रा. शाळा, थकबाकी रक्कम रुपये 5,26,489 बाबत मुख्याध्यापक कार्यालय सील करण्यात आले. यावेळी वरिष्ठ कर निर्धारक व संकलक दत्तात्रेय केनेकर, पथक प्रमुख कं.क.अ. धिरज राठोड, क.लि. श्रीपाद सुभेदार, क.लि. संजय साबळे, कं.क.अ. शिवाजी चित्रक, वसुली कर्मचारी रोहित गायकवाड, महेश दौंड, सहदेव राठोड, शुभम कीर्तीशाही, संकेत चव्हाण, सोहेल खान यांची उपस्थिती होती.
झोन कार्यालय 7 अंतर्गत थकीत मालमत्ता कर धारकांनी आपल्या कडील थकीत मालमत्ता कर भरणा करावा अन्यथा
मोठ्या थकबाकीदारांवर अजून कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त प्रसाद देशपांडे यांनी कळविले आहे.
What's Your Reaction?