आदीवासी बांधवांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे हिच बिरसा मुंडा यांना श्रद्धांजली...

 0
आदीवासी बांधवांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे हिच बिरसा मुंडा यांना श्रद्धांजली...

आदिवासी बांधवांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे हिच खरी बिरसा मुंडा यांना श्रद्धांजली_ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी             

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 15(डि-24 न्यूज) आदिवासी समाजातील आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्काचे संरक्षण आणि संघटनातून स्वातंत्र्य ,अस्मिता व आदिवासीना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली. केंद्र आणि राज्य शासनाच्या आदिवासी भागामार्फत आदिवासींच्या कल्याणासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हे हीच खरी आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्ताने श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बिरसा मुंडा यांच्या 150 व्या याजयंतीनिमित्त आदिवासी प्रकल्प कार्यालय मार्फत कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा नियोजन सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमास आदिवासी विभागाच्या प्रकल्प संचालक चेतना मोरे, प्रमुख मार्गदर्शक चित्रा पुराणिक ,वनवासी कल्याण आश्रमाचे चंद्रकांत मुगले, स्मिता पाडळकर यांच्यासह आदिवासी विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, बिरसा मुंडा यांनी मूळ आदिवासी समाजाच्या हक्काचे संरक्षण करण्या बरोबरच जंगल संरक्षणाचे काम केले. त्यांनी आदिवासींमध्ये अंधश्रद्धा विरुद्ध जनजागृती शिक्षणाच्या बाबतीत पुढाकार घेऊन आदिवासी समाजातील मुलांना जल, जमीन आणि जंगल याची संरक्षण व हक्काचे संरक्षण करण्याची प्रेरणा दिली. इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये उलगुलान सारख्या बंडातून त्यांनी पारतंत्र झुगारून सर्व आदिवासी जाती मध्ये जनजागृती केली. अस्मिता आणि संघटन त्याच्या माध्यमातून हक्काचे संरक्षण केले. देशातील आदिवासी समाजाच्या बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केंद्रशासन आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत . धरती आभा, शबरी आवास,या योजना च्या माध्यमातून हक्कांच्या संरक्षणाबरोबरच त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सहभाग घेऊन त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी संबंधित उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना दिले. आदिवासी विभागाने बिरसा मुंडा यांचे चरित्र सर्वसामान्य नागरिकांना माहित व्हावे यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे , त्यांच्या बलिदानातून आदिवासी विकासाच्या विविध योजना उदयास आलेल्या आहेत असे मार्गदर्शनात सांगितले. सामाजिक कार्यकर्त्या ,चित्रा पुराणिक यांनी बिरसा मुंडा यांच्या जन्मापासून त्यांचे शिक्षण, आदिवासी समाजातील केलेले संघटन, इंग्रजां विरुद्ध उभारलेला लढा विविध क्रांतिकारी संघटनांचे संघटन याचे योगदाना याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक पूनम आखरे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. वायाळ यांनी केले. या कार्यक्रमात आदिवासी गीताच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती विषयी वैष्णवी पवार आणि अर्चना निकम यांनी गीत सादर केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow