अकबरोद्दीन ओवेसी यांचे शहरात आगमन, उद्या आमखास मैदानावर जाहीर सभा

 0
अकबरोद्दीन ओवेसी यांचे शहरात आगमन, उद्या आमखास मैदानावर जाहीर सभा

अकबरोद्दीन ओवेसी यांचे शहरात आगमन, उद्या आमखास मैदानावर जाहीर सभा

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज) आज रात्री 8 वाजता चिकलठाणा विमानतळावर एमआयएमचे नेते तथा तेलंगाणाचे आमदार अकबरोद्दीन ओवेसी यांचे आगमन झाले. विमानतळावर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबाद पूर्वचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी औरंगाबाद मध्यचे उमेदवार नासेर सिद्दीकी व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला. आज ते शहरात मुक्कामी राहणार आहे. 

उद्या 5 नोव्हेंबर रोजी, मंगळवारी रात्री 7 वाजता दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी यांनी सांगितले. आमखास मैदानावर दोन्ही ओवेसी बंधूंची सभा गाजलेली आहे उद्या होणाऱ्या सभेला किती गर्दी होईल बघावे लागेल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow