"बटोगे तो कटोगे" म्हणणारेच जातीय तेढ निर्माण करत आहे - अकबरोद्दीन ओवेसी

 0
"बटोगे तो कटोगे" म्हणणारेच जातीय तेढ निर्माण करत आहे - अकबरोद्दीन ओवेसी

"बटोगे तो कटोगे" म्हणणारेच देशात जातीय तेढ निर्माण करत आहे - अकबरोद्दीन ओवेसी 

एमआयएमला जातीयवादी पक्ष म्हणून बदनामी केली जाते हा पक्ष सर्व जाती धर्मासाठी काम करत आहे.... निकालानंतर सत्तेची चाबी आमच्याकडे असेल....मराठा आरक्षणासोबत मुस्लिम समाजाला आरक्षणासाठी जरांगेसोबत लढा देणार... सध्या जे पक्ष निवडणुक लढत आहे त्यांची विचारधारा राहिलेली नाही म्हणून त्यांनी आत्तापासूनच मोदींसारखी गॅरंटी द्यावी, खुर्चीसाठी विचारधारा न बघता कोणत्याही पक्षासोबत जात असल्याचा आरोप ओवेसींनी जाहिर सभेत केला...मतांचे विभाजन होऊ नये म्हणून त्यांनी एमआयएमवर नाराज असलेल्यांना सोबत येण्याचे कळकळीचे आवाहन जाहीर सभेत केले...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.5(डि-24 न्यूज)

या निवडणुकीत दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा व अनेक पक्षांचे उमेदवार निवडणूक लढत आहे काही दिवसांपासून राजकीय परिस्थिती बघता विचारधारा न बघता कोणत्याही पक्षासोबत जाण्याचे घडामोडी घडल्या निकाल आल्यावर उध्दव ठाकरे भाजपासोबत जाणार नाही, शरद पवार भाजपा किंवा शिंदेसोबत जाणार नाही, अजित पवार हे पुन्हा शिंदेसोबत जाणार नाही, काँग्रेस सत्तेसाठी मिलिभगत करणार नाही अशी गॅरंटी द्यावी जातीयवादी म्हणून हिनवणा-यांनी याचे उत्तर द्यावे आम्ही सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन काम करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे त्यासोबतच मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे त्यांच्या सोबत न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणार. भाजपाच्या वतीने "बटोगे तो कटोगे" बोलले जात आहे असे म्हणणारेच दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मुस्लिम समाजाला लिंचिंगच्या नावावर, बिफच्या नावावर मारले जात आहे अशी परिस्थिती देशात सुरू आहे हे आता थांबले पाहिजे. दोन समाजात एकजुट कायम राहावी यासाठी काम करण्याची गरज आहे. औरंगाबादचे नामांतर केले यामुळे रोजगार मिळणार आहे का...? यामुळे महागाई कमी होईल का...? बेरोजगारांना नोकरी मिळणार आहे का...रुपयाची किंमत कमी होत चालली आहे तर इंधनाचे दर भडकत आहे हे कमी करण्यासाठी सरकार काय करत आहे असा सवाल आमखास मैदानावर भव्य जाहीर सभेत एमआयएमचे नेते तथा तेलंगाणाचे आमदार अकबरोद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केला.

त्यांनी पुढे सांगितले शहरात एमआयएम नावाचे एक रोपटे लावले होते, आज त्याचे झाड झाले असून त्याला फळे आले आहेत. हे फळे खाण्याऐवजी त्याला कापू नका, हा काळ आपल्यासाठी सुवर्णकाळ आहे. यासाठी सर्वांनी एकत्र या असे आवाहन एमआयएमचे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी केले. तसेच मराठा समाजासोबत मराठवाडा ही मागासलेला आहे. यासाठी मराठा, दलित, मुस्लिम यांनी एकत्र यावे. आम्ही निवडून आल्यावर मराठवाडा विकास वैधानिक विकास मंडळासाठी 50 हजार कोटीचा निधी मिळवून मागासलेपण दूर करण्यासाठी प्रयत्न करणार.

औरंगाबाद पूर्वचे उमेदवार इम्तियाज जलील व औरंगाबाद मध्यचे उमेदवार नासेर सिद्धिकी यांच्या प्रचाराला आले असता ओवेसी यांनी हे भाष्य केले.

आमखास मैदान येथे मंगळवारी (५)एमआयएमच्या उमेदवारांची जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, 30 वर्षे झाले मराठवाडा वैज्ञानिक विकास मंडळ तयार होऊन मात्र हे केवळ कागदावरच आहे. यात कोणताच विकास झालेला नाही. तसेच मनोज जरांगे पाटील यांचं नाव घेत ओवसी म्हणाले केवळ मराठा समाज मागासलेला नसून संपूर्ण मराठवाडा मागासलेला आहे. मराठवाड्यात पाणी, दवाखाना, बेरोजगारी असे अनेक प्रश्न भेडसावत आहेत. आणि दुसरीकडे देशात महिला सुरक्षा, बेरोजगारी, महागाई, अत्याचार अर्थव्यवस्था, पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहे यावर कोणीच बोलत नाहीत. केवळ जातीचे राजकारण करून हिंदू-मुस्लीम यामध्ये तेढ निर्माण करायचे काम हे राजकारणी लोक करत आहेत. देशात काही झाले तर मुस्लिमांना जबाबदार ठरवतात. मात्र या देशातील सर्वात गरीब आणि मागासलेला म्हणून मुस्लिम समाज आहे. त्यांच्या उन्नतीसाठी कोणताच राजकीय पक्ष पुढाकार व काम करत नाही. केवळ ‘बटो गे तो कटोगे’ अशा घोषणा देत जातिवाद वाढवण्याचा काम भाजप व इतर पक्षाची लोक करत असल्याचेही ते म्हणाले.

सभेत सुत्रसंचलन शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी व शेख अहेमद यांनी केले. माजी जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर यांना निवडणूकीनंतर मोठी जवाबदारी देणार असल्याची घोषणा इम्तियाज जलील यांनी केली. आपल्या भाषणात विरोधकांवर ते बरसले. भाजपाने मत विभाजन व्हावे यासाठी माझ्या विरोधात 16 मुस्लिम उमेदवार उभे केले. असा आरोप करत मला हरवण्यासाठी मोदी योगी येणार आहे. परंतु जनसमर्थन मलाच मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

व्यासपीठावर माजी नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जाहीर सभेत आमखास मैदान खचाखच भरलेले होते. यामध्ये युवकांची संख्या जास्त होती. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आ

ला होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow