टिव्ही सेंटर चौकात पृथ्वीराज चव्हाण यांचा युवा सेनेने जाळला पुतळा...

टिव्ही सेंटर चौकात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पुतळा जाळला...
वादग्रस्त वक्तव्याविरुध्द युवासेना आक्रमक आंदोलन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) -
माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करीत युवा सेना (शिंदे गट) पक्षाच्या वतीने टिव्ही सेंटर चौकात निदर्शने करुन त्यांचा पुतळा तीव्र निदर्शने करत जाळण्यात आला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरुध्द युवा सेनेने आक्रमक आंदोलन करीत पृथ्वीराज चव्हाण यांनी हिंदू समाजाची माफी मागावी अशी मागणी केली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलतांना हिंदू समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद शनिवारी शहरात उमटले. युवा सेनेच्या वतीने टिव्ही सेंटर चौकात जोरदार निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरुध्द जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्या पोस्टरला जोडे मारले. तसेच आंदोलकांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पुतळा जाळला. यावेळी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पृथ्वीराज चव्हाण मुर्दाबाद, जय भवानी.. जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, पृथ्वीराज चव्हाण यांचा निषेध असो अशा जोरदार घोषणा देत टिव्ही सेंटर परिसर दणाणून सोडला होता.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे जोपर्यंत हिंदू धर्माची माफी मागणार नाही तोपर्यंत राज्यात युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनी माफी न मागितल्यास त्यांच्या घरासमोर आंदोलन करुन त्यांना माफी मागण्यास भाग पाडू असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला. हे आंदोलन सुरु असतांना टिव्ही सेंटर चौकाला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत सिडको पोलिस ठाण्यात नेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
पोलिस-आंदोलकात झटापट
टिव्ही सेंटर चौकात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरुध्द जोरदार आंदोलन करीत त्यांचा पुतळा जाळला. युवा सेनेचे पदाधिकारी पृथ्वीराज चव्हाण यांचा पुतळा जाळत असतांना पोलिस आणि आंदोलकात काही काळ झटापट झाली.
यावेळी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख शिवाजी बाबूलाल भगुरे, उपजिल्हा प्रमुख अर्जुन रेड्डी, दत्ता वखरे, सौरभ जंजाळ, अक्षय पोलकर, शहर प्रमुख पप्पु इंगळे, तालूका प्रमुख अनिल जाधव, प्रविण हातकंगने, विजय गायकवाड, जिल्हा समन्वयक भारत भुगे, स्वप्नील भांगे, जिल्हा सचिव संजय तळणकर, चेतन खुर्दे, अमोल धनवटे, उप शहर प्रमुख सनी साळवे, सुरेश जाधव, अक्षय कोकाटे, प्रज्वल ढवळे, यश गायकवाड, प्रसाद निकम, कृष्णा सोनवणे, नोमेश बकले, विशाल गायके, दिपक पवार, काॅलेज प्रमुख निखील काकडे आदी युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?






