वक्फ मालमत्तेवरील अवैध मालमत्तेवर अतिक्रमण करणा-यांसाठी भाडेकरार करण्यासाठी पथक...

वक्फ मालमत्तेवरील अवैध मालमत्तेवर अतिक्रमांना भाडेकरार करण्यासाठी पथक...
लोकांनी सहकार्य करावे - समीर काझी यांचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज), सध्या शहरात महानगर पालिकेच्या वतीने रास्ता रुंदीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. परवानगी न घेता व गुंठेवारी न केलेली बांधकामे पाडण्यात येत आहे. त्यात अनेक वक्फ जमिनींचा ही समावेश असल्याचे निदर्शनास आले आहे. या बाबत वक्फ मंडळा कडून आपल्या जमीनीवरील अतिक्रमणे, बांधकाम सर्वेक्षण व लिझ रुल -2014 च्या तरतुदी नुसार भाडेकरार करण्यासाठी एक पथक गठीत करण्यात आले आहे. पथक शहरातील विविध भागात जाऊन पाहणी करणार आहे. या पथकाचा विरोध न करता त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांनी केले आहे.
वक्फ मंडळाच्या पथकात चार अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आले आहे. यात मुझंमिल खान, साहिल पठाण सोबत इतर दोन कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आले आहे. पथकाच्या कामकाजावर निगराणी, नियंत्रण व आढावा घेण्याची जबाबदारी विशेष अधीक्षक खुसरो खान यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांना सर्वेक्षण लवकरात लवकर पथका कडून करून घेण्याचे निर्देश ही देण्यात आले आहे. सदर पथक ज्या भागात वक्फ जमीनी आहेत व त्यावर तरतुदीनुसार भाडेकरार न करता विना परवानगी बांधकामे करण्यात आली, अशा मालमत्तांचे सर्वेक्षण करून मोजणी करण्यात येणार आहे.
भाडेकरार करा,संधीचा फायदा घ्या...
वक्फ मंडळाच्या वतीने या
पूर्वीच अतिक्रमण धारकांना आवाहन करण्यात आले होते, बुलडोझर कारवाई पासून आपली बांधकामे सुरक्षित राखण्यासाठी लोकांना ही मोठी संधी आहे. त्याचा फायदा उचला, नसता भविष्यात बांधकामे पाडण्यात आली तर वक्फ मंडळ जबाबदार राहणार नाही असे आवाहन व इशारा समीर काझी यांनी दिला. ते म्हणाले अनेक वक्फ मिळकतीवर अनधिकृतरित्या खरेदी-विक्री करून विना परवानगी मोठी बांधकामे उभारण्यात आली आहे. हे बेकायदेशीर आहे. ज्या भागातील लोकांनी असे कृत्य केले असेल त्यांना लीज रुल - 2014 च्या भाडेकरार तरतुदी नुसार भाडेकरार करून घायवा असे आवाहन ही शेवटी समीर काझी यांनी केले आहे.
What's Your Reaction?






