महायुतीच्या अपयशी कारभारामुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच, कृषीमंत्री गेले थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनवारीला

 0
महायुतीच्या अपयशी कारभारामुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच, कृषीमंत्री गेले थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनवारीला

महायुतीच्या अपयशी कारभारामुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच...

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार...

दाभाडे यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यावर कठोर कारवाई करा; श्री. वडेट्टीवार यांची मागणी...

दाभाडे कुटुंबियांची श्री. वडेट्टीवार यांनी घेतली भेट... एकीकडे शेतकरी आत्महत्या वाढत आहे सर्वात जास्त आत्महत्या कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात होत असताना पाण्यासाठी वनवन सुरू असताना ते थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनवारीला गेले हे राज्याचे दुर्देव आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे...

औरंगाबाद, दि.30(डि-24 न्यूज) मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. पिंपळखुंटा या गावातील विठ्ठल दाभाडे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. शेती गहाण ठेऊन काढलेल्या कर्जाचे बँक पैसे देत नाही. बँक मॅनेजरने कर्जाचे पैसे खात्यात जमा करायला टाळाटाळ केल्यामुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचा हा गंभीर आरोप आहे. या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करत महायुती सरकारच्या अपयशी कारभारामुळे आत्महत्या सुरु असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. त्याचबरोबर दाभाडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन या कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी दिला.

 पिंपळखुंटा गावातील विठ्ठल नामदेव दाभाडे वय ५२ वर्ष यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. एका खाजगी बँकेकडे चार महिन्या पूर्वी शेती तारण ठेवून कर्ज मागणी केली असता बँकेने शेती गहाण ठेवून चार पाच महिने झाले तरी बँकेचे शाखाधिकारी पैसे खात्यावर टाकण्यासाठी टाळाटाळ करत राहिले. त्यामुळे निराश होऊन दाभाडे या शेतकऱ्यांने आत्महत्या केली. विठ्ठल दाभाडे यांनी आत्महत्या करताना चिठ्ठी लिहली असून यामध्ये बँक मॅनेजर पैसे द्यायला टाळाटाळ करत असल्याचे म्हटले आहे. आता मी खचलो..मी माझ्या नशिबावर नाराज आहे. कर्ज मंजूर होऊन तब्बल चार महिने कर्जाची रक्कम खात्यात टाकली नाही, असे या चिट्ठीत म्हटले आहे.बँक मॅनेजर आणि एजंट पैसे मागत असल्याची देखील तक्रार दाभाडे कुटुंबीयांची आहे. 

हे प्रकरण गंभीर असून महायुती सरकारचे हे अपयश आहे. सरकारने या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे, आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी मागणी श्री. वडेट्टीवार यांनी केली आहे.

मराठवाड्यात पाण्याची टंचाई आहे. यामुळे येथील नागरिकांची पाण्यासाठी वनवन होत आहे. राज्यात 73 टक्के दुष्काळ आहे त्यांचे झळा मराठवाड्याला सोसावे लागत आहे. नैसर्गिक आपत्तीत पिकांची झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. बि बियाणे महाग झाले आहे. बि बियाणे व शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांवर 18 टक्के जिएसटी हे सरकार घेत आहे दुसरीकडे सोने हि-यांवर दोन तीन टक्के एक्साईज ड्युटी घेतली जाते. जिल्ह्यात 1562 गावात पाण्याची टंचाई आहे. तर मराठवाड्यात 1869 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन नवीन कर्ज बँकेमार्फत सरकारने उपलब्ध करून द्यावे व बि बियाणे मोफत द्यावे. शेतकऱ्यांची विजेच्या बिलात सुट द्यावी तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. अशी काँग्रेसची मागणी आहे. राज्यात काँग्रेसने दुष्काळी दौरा सुरू केला आहे. गावागावात नेते भेट देऊन पाहणी करुन विभागीय आयुक्त यांना निवेदन सादर करणार आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेत विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ कल्याण काळे, शहराध्यक्ष युसुफ शेख उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow