दौलताबाद किल्ला ते वेरुळ लेणी वाहतूक (रविवारी)मार्गात बदल
दौलताबाद किल्ला ते वेरुळ लेणी वाहतूक मार्गात रविवारी (दि.1 डिसेंबर) बदल
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.30(डि-24 न्यूज)- दौलताबाद किल्ला ते वेरुळ लेणी या दरम्यान रविवार दि.1 डिसेंबर रोजी औरंगाबाद ब्लॅक बक्स समुहा तर्फे मॅरेथॉन रन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या मॅरेथॉन स्पर्धेच्या कालावधीत (सकाळी चार ते दुपारी 12 वाजेपर्यंत) छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) आयुक्तालय हद्दीतील दौलताबाद टी पाँईअ ते वेरुळ लेणी मार्गावरील वाहतुक बंद ठेऊन वाहतुकीत बदल करण्यात आला आहे, तसे आदेश पोलीस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड यांनी निर्गमित केले आहे.
मॅरेथॉन स्पर्धा ही दौलताबाद ते वेरुळ लेणी या रोडवर असून रविवार दि.1 डिसेंबर रोजी पहाटे चार ते दुपारी 12 वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) ते वेरुळ मार्गावरील वेरुळ लेणी ते कागजीपूरा पोलीस आयुक्तालयातील हद्दीपर्यंतचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. या कालावधीत वाहतुकीच्या मार्गातील बदल - छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)- दौलताबाद मार्गे वेरुळ लेणी जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद )– दौलताबाद टी पाँईन्ट (शरणापूर) कसाबखेडा – वेरुळ मार्गे जातील.
वेरुळ – खुलताबाद – दौलताबाद मार्गे छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) कडे येणारी वाहतूक वेरुळ – कसाबखेडा – माळीवाडा – दौलताबाद टी पाँईन्ट मार्गे- छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) कडे येईल.
फुलंब्री – खुलताबाद – वेरुळ जाणारी वाहतुक फुलंब्री – छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)– नगरनाका – दौलताबाद टि पाँईन्ट – कसाबखेडा मार्गे वेरुळला जाईल.
वेरुळ – खुलताबाद – फुलंब्री जाणारी वाहतूक वेरुळ – कसाबखेडा – दौलताबाद टि पाँईन्ट छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) मार्गे फुलंब्री कडे जाईल.
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) – दौलताबाद – खुलताबाद जाणारी वाहतूक छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) – फुलंब्री मार्गे खुलताबाद जाईल.
खुलताबाद – दौलताबाद मार्गे छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) जाणारी वाहतुक खुलताबाद – फुलंब्री मार्गे छत्रपती संभाजीनगरला(औरंगाबाद) जाईल.
What's Your Reaction?