हज यात्रेसाठी 26 मे पासून रवाना होतील यात्रेकरू...! मुंबई व हैदराबाद येथून थेट विमान

 1
हज यात्रेसाठी 26 मे पासून रवाना होतील यात्रेकरू...! मुंबई व हैदराबाद येथून थेट विमान

हज यात्रेसाठी 26 मे पासून रवाना होतील यात्रेकरू...!

सेंट्रल हज कमेटीचे सदस्य हाजी एजाज देशमुख यांची माहिती....यंदा मुंबई आणि हैदराबाद येथून जाणार हज यात्रेकरू, हमसफर ट्राव्हल्स यात्रेकरूंना घेऊन जाणार मुंबई, उद्यापासून हज हाऊसमध्ये बुकींग सुरू...! मुंबई जाण्यासाठी एका हज यात्रेकरु साठी एसि कोच बससाठी 1500 रुपये तिकीट लागणार आहे, चहा, नाश्ता दिला जाणार आहे....

औरंगाबाद, दि.23(डि-24 न्यूज) पवित्र हज यात्रा 26 मे 2024 पासून सुरू होत आहे. चिकलठाणा विमानतळावरुन हज यात्रेकरू गेल्यास 80 हजार रुपये जास्त मोजावे लागत असल्याने सेंट्रल हज कमेटीने हे पैसे वाचवण्यासाठी मुंबई व हैदराबाद येथून 1800 हुन अधिक यात्रेकरूंना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतून जाणाऱ्या हज यात्रेकरूंसाठी औरंगाबाद येथील हज हाऊस येथून हमसफर ट्राव्हल्समध्ये जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे हज यात्रेकरुंसाठी रिपोर्टींग व ट्राव्हल्स तिकीट बुकिंग करण्यासाठी उद्यापासून सुरुवात करणार आहोत. मुंबईपर्यंत प्रवास सुखकर करण्यासाठी सेंट्रल हज कमेटी व राज्य हज कमेटी प्रयत्नशील आहे. कोणत्याही प्रकारचा त्रास हज यात्रेकरूंना होणार नाही यासाठी दक्षता घेतली जात आहे. यासाठी एनजीओ व स्वयंसेवकांची मदत खिदमतसाठी घेतली जाणार आहे. पहेला जत्था हज हाऊस येथून 26 मे पासून रवाना होणार आहे. दुसरा 27 मे, तिसरा 28 मे, चौथा 2 जून, पाचवा 3 जून, सहावा जत्था 4 जून रोजी जाणार आहे. शेवटची फ्लाईट भारतातून 9 जून रोजी जाणार असल्याचा माहिती पत्रकार परिषदेत सेंट्रल हज कमेटीचे सदस्य हाजी एजाज देशमुख यांनी दिली आहे.

यावेळी हमसफर ट्राव्हल्सचे शेख रियाज, सरताज खान, एजाज सिद्दीकी, जब्बार बागवान, मसीयोद्दीन सिद्दीकी, याकूब खान, शेख हमीद, शेख सलिम चिश्ति, सय्यद सलिम, कासम पटेल, सय्यद इरफान, इरफान खान उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow