जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी वेरुळ येथे केला मुक्काम...!

 0
जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी वेरुळ येथे केला मुक्काम...!

घृष्णेश्वर मंदिर विकास आराखड्यातील कामे गतीने पूर्ण करा-जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.

छत्रपती संभाजीनगर, दि. 10(डि-24 न्यूज)-घृष्णेश्वर मंदिर विकास आराखड्यातील कामे गतीने पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी आज वेरूळ ता. खुलताबाद येथे दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी वेरूळ येथील मालोजीराजे भोसले यांच्या गढीला भेट दिली. शहाजीराजे भोसले स्मारकाची पाहणी केली. वेरूळ येथे सुरू असलेल्या घृष्णेश्वर मंदिर विकास आराखड्यातील कामांची पाहणी करून विकास कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

याप्रसंगी  मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू पी. एम., अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकूने, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार संतोष गुट्टे, नायब तहसीलदार सुभाष पांढरे, सहाय्यक गटविकास अधिकारी  हणमंत बोयनर, गटशिक्षणाधिकारी श्रद्धा ताटे, विस्तार अधिकारी विलास केवट, दीपक बागुल, मंगेश शिंदे, प्रतिभा कांबळे, आरोग्य पर्यवेक्षक बी के चव्हाण, मंडळ अधिकारी विजय चव्हाण, ग्राम महसूल अधिकारी भूषण रोजेकर, ग्रामपंचायत अधिकारी गंगाधर गायकवाड, पोलीस पाटील रमेश ढिवरे  व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

वेरूळ भेटी प्रसंगी जिल्हाधिकारी गौडा यांनी जनगणनेच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला. वेरूळ येथे तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांशी संवाद साधला. बुधवारी रात्री जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. हे वेरूळ येथे मुक्कामी

होते. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow