22 ऑगस्टला रिक्षाचालक उतरणार रस्त्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार निदर्शने
22 ऑगस्टला रिक्षाचालक उतरणार रस्त्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार निदर्शने
छ.संभाजीनगर(डि-24 न्यूज) रिक्षाचालक मालकांच्या हक्काच्या मागणीसाठी सर्व रिक्षा संघटना एकजूट दाखवून रस्त्यावर उतरणार आहे.
सर्व रिक्षा संघटनांची आज दुपारी सुभेदारी विश्रामगृहात महत्वाची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत नवीन परमिट बंद करावे, ऑनलाईन पावती बंद करून दंड माफ करावे. ई-रिक्षांना शासन नियमानुसार वाहतूकीसाठी परवानगी द्यावी, शहरात त्यांना बंदी घालावी अशा विविध मागणीसाठी हजारो रिक्षा चालक मालक 22 ऑगस्ट रोजी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करणार असल्याची माहिती लाल बावटा रिक्षा चालक संघटनेचे अॅड अभय टाकसाळ, रिक्षा चालक महासंघाचे अध्यक्ष निसार अहमद खान यांनी दिली आहे.
यावेळी रिक्षाचालकांनी त्यांच्या हक्काच्या मागणीसाठी एक तास देऊन आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.
याप्रसंगी रिक्षाचालक महासंघाचे अध्यक्ष निसार अहमद खान, लाल बावटा रिक्षा चालक संघटनेचे अॅड अभय टाकसाळ, न्यू जनता रिक्षा युनियनचे अज्जू लिडर, काँग्रेस रिक्षा संघटनेचे मो.बशिर, छावा रिक्षा संघटनेचे प्रकाश हेगडे, बिसन लोधे, रिक्षा चालक मित्र मंडळ संघटनेचे शेख अमजद, भिमशक्ती रिक्षा संघटनेचे गजानन वानखेडे, भाजपा प्रणित रिक्षा संघटनेचे मनोज जैस्वाल यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?