सरपंच मंगेश साबळे यांचे आमरण उपोषण अखेर मागे...

सरपंच मंगेश साबळे यांचे आमरण उपोषण अखेर मागे...
सिल्लोड, दि.6(डि-24 न्यूज)-
शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी मागिल काही दिवसांपासुन सिल्लोड तहसील कार्यालयासमोर गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांचे आमरण उपोषण सुरू होते. आज मंत्री अतुल सावे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. त्यांनी मध्यस्थी करत आश्वासन दिल्याने आज दुपारी साबळे यांनी उपोषण सोडले. त्यांची तब्येत उपोषणामुळे खालावत गेली होती.
ओला दुष्काळ जाहीर करुन एकरी 50 हजार रुपये सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून खरडून गेली त्या शेतकऱ्यांना एकरी 1 लाख रुपये मदत करावी. ज्या शेतकऱ्यांची जनावरे पुरात वाहून गेली त्यांना सरसकट 50 हजार रुपये मदत करावी. रब्बी हंगामासाठी बी-बीयाणे व खत शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी साबळे यांची सरकारकडे आहे. राज्य सरकारकडे याविषयी पाठपुरावा करून त्यांच्या मागण्या सोडवण्यात येतील असे आश्वासन यावेळी मंत्री अतुल सावे यांनी दिले.
यावेळी सुहास शिरसाट, सुरेश बनकर, सुनील मिरकर, इद्रीस मुलतानी, ज्ञानेश्वर मोटे, विजय काकडे पाटील, मनोज मोरुल्लू, नारायण बडक, मकरंद कोरडे, कमलेश कटारीया आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






