शहरात 10 किलो गांजा पकडला, एक आरोपी अटक...

बंगळुरूला गांजा विक्रीसाठी घेऊन जाणारा युवक पोलिसांच्या जाळ्यात; 10 किलो 175 ग्रॅम गांजा जप्त...
छत्रपती संभाजीनगर, दि.6(डि-24 न्यूज)-
शाहनूरमिया दर्ग्याजवळ येथून ट्रॅव्हल्सने बंगळुरूला गांजा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या एका युवकाला जबाहरनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 10 किलो 175 ग्रॅम वजनाचा गुंगीकारक वनस्पतीजन्य गांजा जप्त केला असून, त्याची किंमत अंदाजे ₹2,10,600 रुपये इतकी आहे.
पोलिस स्टेशन जबाहरनगर येथील गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे शाहनूरमिया दर्ग्याजवळ येथून ट्रॅव्हल्सने गांजा नेण्यात येणार असल्याचे समजताच, पोलीस निरीक्षक सचिन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. राहुल विशाळ, पो.उप.नि. राघवेंद्र बाघ, पो.हे.कॉ. सचिन भिस्कार, पो.ना. बंकर, पो.ना. गोरे यांच्या पथकाने ठिकाणी सापळा रचला.
या कारवाईत संशयित इरफान पाशा आरीफ पाशा (वय 42, रा.भंगी कॉलनी, पेन्शन मोहल्ला, दक्षिण बंगळुरू) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून दोन वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये सुमारे 10 किलो 175 ग्रॅम गांजा आढळून आला. आरोपी हा गांजा बंगळुरूमध्ये विक्रीसाठी घेऊन चालला होता, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी NDPS कायद्यांतर्गत गुन्हा क्रमांक 362/2025 कलम 20(B) नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब वाघ करीत आहेत.
या यशस्वी कारवाईत पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलिस आयुक्त मनिष कल्याणकर, पोलीस निरीक्षक सचिन कुंभार , पो.उप.नि. रावसाहेब वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील सपोनि लोहकरे, पोउनि राहुल बिघोत, पोह संदीप क्षीरसागर, सपोनि रमेश जाधव, पोह बनकर, पोअं मारोती गोरे, ज्ञानेश्वर शेलार सर्व पोलिस कर्मचारी सहभागी होते.
What's Your Reaction?






