मोपेडस्वाराने वृध्दाला धडक देऊन फरार, क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

 0
मोपेडस्वाराने वृध्दाला धडक देऊन फरार, क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मोपेडस्वाराने वृध्दाला धडक देऊन फरार, क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.7(डि-24 न्यूज) समतानगर येथून शुक्रवारच्या नमाजनंतर जालना रोड येथील चुन्नालाल पेट्रोल पंपासमोर असलेल्या आपल्या औरंगाबाद टायर्स वर्क्स नावेच्या दुकानात पायी जाताना वृध्द मोहम्मद याकूब महेमूद याकूब रामपुरे, वय 78, राहणार आरेफ काॅलनी यांना दुपारी दोनच्या सुमारास अज्ञात मोपेडस्वाराने जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. वृद्धाच्या डोक्याला, भुवायाला, उजव्या पायाच्या गुडघ्याच्या पायाखाली जबर मार लागला. त्यांना तीन दिवसांपासून घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अशी माहिती त्यांचा मुलगा अनिस रामपुरे यांनी दिली आहे. मोपेड चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. मोपेड क्रमांक MH-20, GR-6481 च्या चालकाविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जखमी वृद्ध शुध्दीवर आल्यानंतर जवाब नोंदविला. उपचार सुरू असलेल्या वृद्धाच्या मेंदूत रक्त गोठले असल्याने उपचार सुरू असल्याचे घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. पसार झालेल्या मोपेडस्वाराचा पोलिस कसून शोध घेत आहेत. लवकरच सुसाट वेगाने वाहन चालवणाऱ्या वाहनधारकाला अटक केली जाईल अशी माहिती पोलिस निरीक्षकांनी दिली आहे

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow