भाजपाचे राजु शिंदे सहीत विविध पक्षांचे पदाधिकाऱ्यांचा शिवसेना(उबाठा) मध्ये प्रवेश

भाजपाचे राजु शिंदे सहीत विविध पक्षांचे पदाधिकाऱ्यांचा शिवसेना(उबाठा) मध्ये प्रवेश
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.7(डि-24 न्यूज) आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपाचे माजी उपमहापौर राजू शिंदे, माजी नगरसेवक , जिल्हा परिषद सदस्य व विविध पक्षांचे पदाधिकाऱ्यांनी उबाठा गटात प्रवेश केला. बायपास येथील सुर्या लाॅन्सवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंकल्प मेळाव्यात हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार उदयसिंह राजपूत, महानगरप्रमुख राजू वैद्य आदी उपस्थित होते.
यावेळी राजू शिंदे यांच्या सह भाजपाचे माजी नगरसेवक गोकुळ मलके, अन्य पक्षांचे मा. नगरसेवक प्रल्हाद निमगाव कर, मा.नगरसेवक अक्रम पटेल, मा.नगरसेवक प्रकाश गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सतीश पाटील, संभाजी चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष वसंत प्रधान, सरचिटणीस युवा मोर्चा सौरभ शिंदे, युवा मोर्चा अध्यक्ष आकाश पवार, पडेगाव मंडळ अध्यक्ष कैलास वाणी, क्रांतीचौक मंडळ अध्यक्ष शंकर म्हात्रे, सातारा मंडळ अध्यक्ष प्रविण कुलकर्णी, तालुका अध्यक्ष अभिजित पवार, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मयुर चोरडिया, शहर राष्ट्रवादी(अजित पवार) सरचिटणीस डॉ.प्रा.पंडित क्षिरसागर, स्वाती गोणारकर व पैठण येथील अक्षय सिशोदे, भुजंग सिशोदे व काही पदाधिकाऱ्यांना शिवबंधन बांधून उध्दव ठाकरे यांनी पक्षप्रवेश दि
ला.
What's Your Reaction?






