माथाडी कामगारांच्या प्रश्नावर डॉ.बाबा आढाव यांचे आझाद मैदानावरील बेमुदत उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच...!

 0
माथाडी कामगारांच्या प्रश्नावर डॉ.बाबा आढाव यांचे आझाद मैदानावरील बेमुदत उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच...!

माथाडी कामगारांच्या प्रश्नांवर डॉ. बाबा आढाव यांचे आझाद मैदानावरील बेमुदत उपोषण तिसऱ्या दिवशी ही सूरूच......!!..

मुंबई, दि.28(डि-24 न्यूज)

राज्यात माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि सरकारचे वतीने कायदा संपविण्यासाठी चाललेले सर्व प्रयत्न तात्काळ थांबवावेत म्हणून महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी , माथाडी कायदा बचाव कृति समितिचे वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले असल्याची माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष साथी विकास मगदूम यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

डॉ . आढाव त्यांचे बरोबर माथाडी कामगारांचे नेते मा. नरेंद्र अण्णासाहेब पाटील व महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे ही बेमुदत उपोषण करीत असून, रोज हजारो माथाडी कामगार साखळी उपोषण करीत असल्याची माहिती पत्रकात नमूद केली आहे.

राज्यात माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. माथाडी कायद्याचा आत्मा काढून घेणारे माथाडी विधेयक 34 तात्काळ मागे घ्यावे. बाजार समित्यांचे केंद्रीकरण करणारे 2018 चे विधेयक क्र.64 ही तात्काळ मागे घ्यावे. माथाडी मंडळातील नोकर भरती तात्काळ सूरु करून तेथे माथाडी कामगारांच्या पाल्यांना प्राधान्याने नोकरी द्यावी. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांचे परवाने तात्काळ रद्द करावेत, डायरेक्ट वाहतूक व द्वार पोंच ची कामे शासकीय धान्य गोदामातील नोंदीत माथाडी कामगारांकडूनच करून घ्यावीत. माथाडी कामगारांचे पगार वेळेवर करावेत व न करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करावी. शासकीय धान्य गोदामातील माथाडी कामगारांची थकबाकी तात्काळ वसूल करावी. या व अन्य मागण्यासाठी राज्यातील माथाडी कामगार मुंबई येथील आझाद मैदानावर सोमवार पासून बेमुदत आमरण व साखळी उपोषणाला बसले आहेत.

उपोषण व आंदोलनाची सुरुवात डॉ. बाबा आढाव यांनी गायीलेल्या महात्मा फुले यांचे प्रार्थनेने झाली. यावेळी कृती समिती चे अनेक पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी विशद केली त्यात, मुंबईचे बळवंतराव पवार, अविनाश रामिष्टे, अरुण रांजणे, महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे, उपाध्यक्ष राजकुमार घायाळ, संतोष नांगरे इ. चा सहभाग होता.

या आंदोलनाला कालपासून विविध क्षेत्रातील लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी येवून आपला पाठींबा दिला त्यात माजी कामगार मंत्री व माजी खासदार हुसेन दलवाई, माजी कामगार मंत्री नाईक, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आ.सचिन आहिर, आ. भाई जगताप, आ. शशिकांत शिंदे, आ. रोहित पवार, आ. निरंजन डावखरे, आ. अनिकेत तटकरे, आ. प्रवीण दटके तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.भालचंद्र मुणगेकर, प्रा.संजय मं.गो.इ. चा प्रमुख सहभाग होता.

माथाडी कामगारांचे या आंदोलनाची चर्चा विधिमंडळात होवून, डॉ. बाबा आढाव या वयोवृद्ध नेत्याचे वय लक्षात घेता, त्यांचे व त्याचे सहकाऱ्यांचे उपोषणात सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा अशी भूमिका विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडल्यावर, आंदोलनाच्या शिष्टमंडळास कॅबिनेट मंत्री भुसे यांनी भेटावे असे सांगितले गेल्यावर, माथाडी कायदा बचाव कृति समिति चे शिष्टमंडळ भुसे यांना भेटले व आंदोलनाच्या मुख्य मागण्यांबाबत चर्चा केली. शिष्टमंडळात आ.शशिकांत शिंदे, मा. आ. नरेन्द्र पाटील, बळवंतराव पवार, साथी सुभाष लोमटे, अरुण रांजणे, पोपटराव देशमुख, मा. भोसले मॅडम, अविनाश रामिष्टे इ. चा सहभाग होता. चर्चे अंती भुसे यांनी आंदोलकांची ची भेट मुख्यमंत्र्याबरोबर उद्या म्हणजे दि.29 तारखेस घालून देण्याचे आश्वासन दिले. उद्याची मुखमंत्र्यांची भेट होईपर्यत आंदोलन - बेमुदत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

महामंडळाचे प्रतिनिधी पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, धुळे, नंदुरबार, बीड, औरंगाबाद इ. जिल्हयातून सहभागी झाले होते ज्यात हनुमंतराव बहिरट, गोरख मेंगडे, हुसेन पठाण, चंद्रकांत मानकर इ. प्रमुख सहभाग होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow