300 बससाठी मनपाने उभारला भव्य बस डेपो, लवकरच नागरीकांच्या सेवेत
भव्य बस डेपो लवकरच नागरिकांच्या सेवेत...
औरंगाबाद, दि.28(डि-24 न्यूज) जाधववाडी येथे स्मार्ट सिटी अंतर्गत तयार करण्यात येणारा बस डेपो लवकरच कार्यान्वित होणार आहे असे स्मार्ट सिटी कार्यालया कडून कळवण्यात आले आहे.
आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली 7 एकर जागेवर जाधववाडी येथे स्मार्ट सिटी मार्फत अत्याधुनिक बस डेपो तयार होत आहे. ह्या बस डेपो मधे 300 बसेस उभ्या राहू शकतात. स्मार्ट सिटी मार्फत स्मार्ट शहर बस सेवा देण्यात येते. या सेवेचे बळकटीकरण करण्यासाठी व ती बस सेवा दीर्घकाळ टिकावी यासाठी बस डेपो हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे.
हा बस डेपो चे कार्य युद्ध पातळी वर सुरु असून लवकरच सदर बस डेपो कार्यान्वित होईल, अशी माहिती स्मार्ट सिटी मार्फत देण्यात आली आहे.
सध्या स्मार्ट सिटी मार्फत 100 डिझेल बसेस चालवण्यात येत आहेत. लवकरच स्मार्ट सिटी मिशन व पी एम इ बस सेवांतर्गत 135 इलेक्ट्रिक बसेस या ताफ्यात जुडणार आहे. यामुळे एकूण 235 बसेस ची पार्किंग, चार्जिंग, पंपिंग व देखबाल दुरूस्ती संबंधित गरजा बस डेपोचा मार्फत पुरवली जाणार आहे.
या प्रकल्पाचे वैशिष्ट्य:
7 एकर जागेवर अत्याधुनिक बस डेपो
50 इ बसेस साठी चार्जिंग सुविधा, बसेसच्या देखरेखसाठी सर्व सुविधा.
स्मार्ट बस विभागाची प्रशासकीय इमारत
गाड्यांसाठी डिझेल पंप.
What's Your Reaction?