राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीच्या इच्छुक उमेदवारांचे मुलाखती 5 ऑक्टोबर रोजी
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार इच्छुक उमेदवारांचे 5 ऑक्टोबर रोजी मुलाखत
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज) आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने संसदीय मंडळ(पार्लमेंटरी बोर्ड घोषित केले आहे त्या अंतर्गत आगामी विधानसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी विविध नेत्यांना पार्टीने जवाबदारी निश्चित केली आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना विशेष निमंत्रित म्हणून मराठवाड्याची जवाबदारी दिली आहे. 5 ऑक्टोबर रोजी इच्छुक उमेदवारांचे मुलाखती घेण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. 6 ऑक्टोबर रोजी विदर्भ खासदार अमर काळे, उत्तर महाराष्ट्राची 7 ऑक्टोबर रोजी खासदार निलेश लंके व भास्कर मगरे हे विशेष निमंत्रित म्हणून मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेत उपस्थित राहतील असे महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे रविंद्र पवार यांनी कळविले आहे.
पार्लमेंटरी बोर्डातील सदस्य...
अध्यक्ष शरदचंद्र पवार, जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर, श्रीमती वंदना चव्हाण, आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे, नरेंद्र वर्मा, नसीम सिद्दीकी, श्रीमती रोहिणी खडसे, राज राजापूरकर, पी.सी.चाको, अरुण गुजराथी, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील, श्रीमती फौजिया खान, प्राजक्ता तनपूरे, सुनील भुसारा, जयदेव गायकवाड, श्रीमती विद्या चव्हाण, श्रीमती राखी जाधव, महेबुब शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
What's Your Reaction?