मंत्रीपदाचा गैरवापर करून संदीपान भुमरेंनी मिळवले वाईन शॉपचे परवाने - दत्ता गोर्डे
भुमरे यांनी मंत्री पदाचा गैरवापर करून वाइन शॉपच लायसेन्स घेतलेलं आहे - ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे यांचा आरोप.
लवकरच सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार...
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार संदिपान भुमरे यांनी मंत्री पदाचा गैरवापर करून वाईन शॉपचे परवाने घेतल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे यांनी आज पत्रकार परिषदेत केलाय.
लोकायुक्तांकडे रीतसर तक्रार करून लवकरच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती दत्ता गोर्डे यांनी दिली. दत्ता गोर्डे हे पैठणचे माजी नगराध्यक्ष असून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आहे. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे खासदार संदीपान भूमरे विरोधात पुरावे सुद्धा सादर केल्याची माहिती देखील पत्रकार परिषदेत दिली. वाईन शॉपचे जागा स्थलांतर करण्यासाठी पाच कोटींचा खर्च केला. निवडणूक शपथपत्रात दोन कोटींचे उत्पन्न दाखवले मग हे पैसे कोठून आणले याची चौकशी करून मनी लाॅंड्रींग ची कार्यवाही करावी अशी मागणी पंतप्रधान व लोकसभा अध्यक्ष व मुख्यमंत्री यांना पत्र लिहून केली असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यांच्या कुटुंबीयांमध्ये पाच वाईन शॉपचे परवाने आहे त्यांनी नियमांचा भंग केल्याप्रकरणी त्या खासदारकी रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
What's Your Reaction?