पत्रकारांवरील हल्ले सहन करणार नाही - व्हाॅईस ऑफ मिडिया

“पत्रकार समाजाचा कणा – त्यांच्यावरचे हल्ले सहन केले जाणार नाहीत” – अब्दुल कय्यूम, प्रदेशाध्यक्ष व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग
पत्रकारांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध – व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग
निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज) -त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे वार्तांकनासाठी गेलेल्या झी-24 तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे आणि पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी केलेल्या भीषण हल्ल्याचा तीव्र निषेध व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग तर्फे करण्यात आला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर संघटनेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनाद्वारे पत्रकारांवरील वारंवार होणाऱ्या हल्ल्यांविषयी तीव्र संताप व्यक्त करत दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष अब्दुल कय्यूम यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ठळकपणे मांडण्यात आला.
अब्दुल कय्यूम यांची ठाम भूमिका
अब्दुल कय्यूम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले – “पत्रकार समाजाचा कणा आहेत. सत्य आणि न्यायासाठी अहोरात्र काम करणाऱ्या पत्रकारांवर होत असलेले हल्ले ही लोकशाहीला काळिमा फासणारी बाब आहे. दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही, ही गंभीर बाब आहे. दोषींवर या कायद्यान्वये तातडीने कारवाई झाली पाहिजे. अन्यथा पत्रकारांच्या सुरक्षेसाठी मोठा संघर्ष उभारावा लागेल. पत्रकारांवरील हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत.”
निवेदनातील प्रमुख मागण्या
हल्लेखोरांना तातडीने अटक करून पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी.राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात.भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी शासनाने ठोस व कडक धोरण आखावे.
पत्रकारांची एकजूट अधोरेखित
या प्रसंगी डॉ. शकील शेख, किशोर महाजन, राष्ट्रीय संघटक परवेज खान, सुजित ताजने, मिर्झा शफीक बेग, इसाक भाई, हसन शाह, अनिस रामपुरे, संजय हिंगोलीकर, बबन सोनवणे, शेख शफीक, दिशा आकाश सुरवसे पाटील, सय्यद करीम, सय्यद शब्बीर, ॲड. अंबादास तळणकर, अनिस शेख, नदीम सौदागर, सुरेश शिरसागर, सय्यद सैफ, मुबाशीर सिद्दीकी, मोहसिन शेख, आवेज कादरी, शेख एजाज, रमेश जाबा, रामेश्वर दरेकर, शेख मुख्तार राजू यांच्यासह अनेक मान्यवर पत्रकार उपस्थित होते.
What's Your Reaction?






