अमित भुईगळ एमआयएम मध्ये व डॉ.गफ्फार कादरी वंचित मध्ये जाणार असल्याची अफवा...!
 
                                अमित भुईगळ एमआयएम मध्ये व डॉ.गफ्फार कादरी वंचित मध्ये जाणार असल्याची अफवा...!
छ.संभाजीनगर(डि-24 न्यूज) वंचित बहुजन आघाडीचे नेते अमित भुईगळ हे एमआयएम मध्ये प्रवेश करुन औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार व एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी हे इम्तियाज जलील विधानसभा निवडणूक लढण्याचे जाहीर केल्याने वंचित मध्ये जाणार असल्याचे अफवा पसरवणारी बातमी पसरवली जात आहे. दोन्ही नेते व त्यांचे समर्थक संतप्त झाले आहेत. काही माध्यमातून हि बातमी धडकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
डि-24 न्यूजने अमित भुईगळ यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले यामध्ये काही तथ्य नाही. श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आयुष्यभर काम केले आहे आणि करत राहणार. पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नाही. मी पक्षाशी एकनिष्ठ आहेत. डॉ.गफ्फार कादरी यांनी सांगितले मी एमआयएम सोडणार नाही. बॅ.असदोद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. औरंगाबाद पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. शहरातील तीनही मतदार संघात एमआयएम निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. माजी खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत आम्ही पक्षाला मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करत आहे. राजकीय वातावरण तापवण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात आहे. यामध्ये कोणतेही तथ्य नाही.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            