स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज व्हा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज व्हा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज) :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे स्थानिक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जसा विजय नेत्यांना मिळाला तसाच विजय कार्यकर्त्यांनाही मिळायला हवा. शासनाने राबवलेल्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, पक्षातील छोटे-मोठे हेवेदावे विसरून पूर्ण क्षमतेने पक्षासाठी काम करावे. नेत्यांनी कार्यकर्त्यांचा केवळ वापर न करता त्यांना बळ द्यायला हवे, जेणेकरून प्रत्येक कार्यकर्ता स्वतःला विजयी वाटेल.
महायुतीच्या एकजुटीवर भर देत शिंदे म्हणाले, “आपण सगळे महायुतीत एकत्र असून येणाऱ्या निवडणुकीला पूर्ण जोमाने सामोरे जाण्यासाठी सज्ज राहावे.”
या बैठकीला सामाजिक न्यायमंत्री आणि संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार अर्जुन खोतकर, आमदार विलास भुमरे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार संतोष बांगर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, आमदार हिकमत उढाण, आमदार संजना जाधव, आमदार प्रा. रमेश बोरनारे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, शहरप्रमुख राजेंद्र जंजाळ तसेच मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
What's Your Reaction?






