डिजिटल मीडीयाचे अधिवेशन ऐतेहासिक ठरणार - बालाजी सुर्यवंशी

डिजिटल मीडियाचे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार : बालाजी सूर्यवंशी
एस. एम. देशमुख यांच्या निर्धाराकडे सर्वांचे लक्ष...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) -
मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या पत्रकारांचे पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, तमाम पत्रकारांचे नेते एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली होणारे हे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार आहे, असा विश्वास छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष तथा स्वागत अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.
येथील जेष्ठ पत्रकार आरेफ देशमुख यांच्या डी-24 न्यूज या वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला. एस.एम. देशमुख हे तळागाळातील आणि प्रामुख्याने ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. पत्रकारांसाठी महागाई निर्देशांकानुसार पेन्शन देण्यात यावी, पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी स्वतंत्र कायदा करा आदी महत्वाच्या मागण्यांसाठी शासनाला वेळोवेळी धारेवर धरत आहेत. तसेच राज्यभरातील डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी आपला झंझावात सुरू केला आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात येत आहे. या अधिवेशनात डिजिटल मीडियाच्या पत्रकारांची एक ओळख समोर येणार आहे. अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली असून, 14 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता सर्व जिल्ह्यातील पत्रकारांनी चलो छत्रपती संभाजीनगरचा नारा देत या अधिवेशनाला यायचे आहे असे आवाहन करण्यात येत आहे. हे अधिवेशन संत एकनाथ रंगमंदीर, उस्मानपुरा येथे होणार आहे. या अधिवेशनासाठी ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे, डॉ. अनिल फळे, डॉ. अब्दुल कदीर, स. सो. खंडाळकर, सुनील वाघमारे, प्रकाश भगनुरे, कानीफ अन्नपूर्णे, माधव जामनिक, ब्रह्मानंद चक्करवार आदी परिश्रम घेत आहेत.
What's Your Reaction?






