जलदगतीने होणार आरोग्य विभागातील पदभरती, इम्तियाज जलील यांच्या याचिकेचा परिणाम

 0
जलदगतीने होणार आरोग्य विभागातील पदभरती, इम्तियाज जलील यांच्या याचिकेचा परिणाम

आता ! जलदगतीने होणार आरोग्य विभागातील पदभरती; महाराष्ट्र लोकसेवा आयोगात स्वतंत्र कक्ष स्थापन

खासदार जलील याचिकेची दखल; राज्यपाल यांच्या आदेशानुसार शासन निर्णय जारी

औरंगाबाद,दि.20(डि-24 न्यूज) उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ यांनी आरोग्य संस्थामधील रिक्त पदांबाबत दाखल केलेली जनहित याचिका क्र.47/2021 इम्तियाज जलील विरुध्द महाराष्ट्र शासन मध्ये दि.20/4/2023 रोजीच्या सुनावणीत दिलेल्या आदेशाची अमलबजावणी करुन वैद्यकीय शिक्षण विभागातील तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत कार्यवाहीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात एक स्वतंत्र कक्ष निर्माण करुन त्याकरीता 3 वर्षाच्या कालावधीकरीता 4 पदांच्या निर्मितीस मान्यता देणेस्तव उपसचिव लिना संखे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने शासन निर्णय जारी केले.

          खासदार इम्तियाज जलील यांच्या याचिकेची दखल घेवुन आरोग्य विभागातील रिक्त पदे भरती करिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येत असल्याचे शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयात स्पष्टपणे नमुद केले आहे.  

          वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने त्यांच्या अधिनस्त राज्यातील शासकीय वैद्यकीय, दंत आयुर्वेद व परिचर्या महाविद्यालये या महाविद्यालयांशी संलग्नित रुग्णालये व महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक व अशैक्षणिक संवर्गातील डॉक्टरांची सरळसेवेच्या कोट्यातील पदे तसेच या संस्थांमधील गट-अ ते गट क मधील रुग्णसेवेशी संबंधित विविध तांत्रिक संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील पद भरतीची प्रक्रिया जलदगतीने होणार आहे.

          महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आयोगाची सध्या मंजूर असलेली पदे व कामाची व्याप्ती विचारात घेता स्वतंत्र कक्षासाठी वाढीव पदाचा प्रस्तावास मंजुरी देवुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगात स्वतंत्र कक्ष निर्माण करुन त्याकरीता 3 वर्षासाठी अवर सचिव / कक्ष अधिकारी 1 पद, सहायक कक्ष अधिकारी 2 पदे व लिपिक-टंकलेखक 1 पद अशी 4 पदे निर्माण करण्यास उच्चस्तरीय सचिव समितीने चक्रीय पध्दतीने मंजूरी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow