जुना बाजार येथील मुख्य जलवाहिनीवरील 9 अनधिकृत नळ खंडीत

 0
जुना बाजार येथील मुख्य जलवाहिनीवरील 9 अनधिकृत नळ खंडीत

जुना बाजार येथील मुख्य जलवाहिनीवरील नऊ अनधिकृत नळ खंडित

औरंगाबाद, दि.19(डि-24 न्यूज) आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अनधिकृत नळ जोडणी शोध पथक प्रमुख मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा पथक प्रमुख संतोष वाहुळे यांच्या अधिपत्त्याखाली जुना बाज़ार येथे असलेल्या हॉटेल न्यु सागर रेस्टॉरंट समोरील महानगरपालिकेची 150 मिमी मुख्य वितरण जलवाहिनी वरील एकूण 9 अनधिकृत नळ खंडित करण्यात आले.

विशेष बाब म्हणजे सदरील नळ जोडणी हे मध्य रात्री 

घेत असल्याची तक्रार अभियंता रोहित इंगळे यांच्या कडे आली असता रात्री सुमारे 1 वाजता नळ घेत असल्याचे दिसून आले. पथक कर्मचारी यांनी जाऊन विचारणा केली असता तेंव्हा एका नळाचे काम चालू होते ते बंद करण्यात आले तर सदरील लोकांनी हे नळ मस्जिदचे असल्याचे सांगितले परंतु जर तुमचे नळ जोडणी अधिकृत असेल आणि मस्जिदचे असेल तर रीतसर पद्धतीने दिवसा घेण्यात यावे असे पथकाने सांगितले. परंतु

सदरील ठिकाणी पहाटे 4 वाजता पुन्हा नळ जोडणी चे काम झाले आणि एकूण 7 पाईप टाकून त्यांना पुढे नेऊन 9 नळ जोडणी करण्यात आले. हे नळ अनधिकृत नळ बाबत शोध पथकाने जेंव्हा मस्जिद मधील काही लोकांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आमचा नळजोडणीशी काही ही संबंध नाही आणि लोक खोटं बोलत असल्याचे सांगितले ह्या गोष्टीची शहानिशा करून जायमोक्यावर खात्री करून घेतली तेंव्हा असे लक्षात आले की अज्ञात नागरिकांनी अनधिकृत प्लंबर द्वारे नळ जोंडण्या घेतल्या व ह्या अनधिकृत नळांशी मस्जिदचा कुठला संबंध नाही असे लक्षात आल्यानंतर हे नळ खंडित करण्यात आले.

सदरील कार्यवाही ही प्रामुख्याने पथक अभियंता रोहीत इंगळे, कनिष्ठ अभियंता सचिन वेलदोडे, सुमेर शेख, हेमंत हिवराळे यांनी उप अभियंता मिलिंद भामरे च्या तक्रारीने आणि

पथक कर्मचारी मो. शरीफ, वैभव भटकर, स्वप्निल पाईकडे, तमिज पठाण, सागर डिघोळे, तुषार पोटपिल्लेवार 

आदींनी पूर्ण केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow