कटकट गेट येथील शत्रु संपत्ती घोषित करणे बेकायदेशीर, काँग्रेसचे विभागीय आयुक्तांना निवेदन...!
कटकट गेट येथील शत्रु संपत्ती घोषित करने बेकायदेशीर, काँग्रेसचे विभागीय आयुक्तांना निवेदन
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.28(डि-24 न्यूज) कटकट गेट, नेहरुनगर परिसरातील मालकी हक्काचे पि आर कार्ड मधून नोंद बेकायदेशीरपणे कोणत्याही प्रकारची पडताळणी न करता डायरेक्ट एकाच रात्री शत्रु संपत्ती म्हणून बेकायदेशीर मालमत्ताधारकांची नावे कमी करण्यात आली. याबाबत यापूर्वी येथील रहिवासी लोक या बेकायदेशीर व असंवैधानिक चुकीच्या कार्यवाही मुळे त्रस्त झाले असून रात्रीची झोप उडाली आहे. ब-याच वर्षांपासून येथील रहिवासी घरे बांधून राहत आहेत. त्यांच्याकडे रजिस्ट्री, पि. आर. कार्ड, 7/12, गुंठेवारी , बांधकाम परवानगी, मनपा टॅक्स पावती, लाईट बील व अन्य शासकीय कागदपत्रे उपलब्ध आहे.
अचानक एकाच रात्री नावे परस्पर सुट्टीच्या दिवशी रात्री पि आर कार्ड मधून नावे कमी करुन शत्रु संपत्ती म्हणून गृहमंत्र्यालयाने आपले नाव लावून एकप्रकारेची तानाशाही, दडपशाही आदेश लागू करण्यात आले आहे. लोकांना त्यांच्या मिकतीमधून मालकी हक्क कमी करण्यात आला. येथे गोरगरीब व विविध जाती धर्मातील लोक राहतात. एकीकडे भारत सरकार गरीबांना राहण्यासाठी घरे देण्यास वचनबद्ध आहे. तर दुसरीकडे याच नागरीकांना राहत्या घरातून बेदखल करणे कितपत योग्य आहे. दोन दिवसांपूर्वी काही अधिकारी येथे सर्वे करण्यासाठी आले होते यामुळे येथील लोक भयभीत झाले आहे. हि मालमत्ता शत्रु संपत्ती नसून मालकी हक्काची आहे. येथे राहणारे सर्व लोक भारतीय आहे. पि आर कार्ड व सातबारा मधील नावे जशीच्या तशी नोंद करुन मालकी हक्क पुन्हा परत देण्यात यावे असे आदेश संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी, नगर भुमापन अधिकारी यांना देण्यात यावे. शासनाकडून येथील रहीवाशांना न्याय मिळवून द्यावा. अशी विनंती विभागीय आयुक्तांची भेट घेऊन युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. न्याय मिळाला नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने दिला आहे. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख युसूफ, मराठवाडा अध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग हामद चाऊस, युवक काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव मसरुर सोहेल खान, युवक काँग्रेसचे इद्रीस नवाब खान, प्रदेश सचिव मोहसीन खान, मध्य विधानसभा अध्यक्ष शेख फैज उपस्थित होते.
What's Your Reaction?