जनतेच्या पैशातून परदेशी वा-या करु नये - आमदार आदित्य ठाकरे

 0
जनतेच्या पैशातून परदेशी वा-या करु नये - आमदार आदित्य ठाकरे

जनतेच्या पैशातून परदेशी वा-या करु नये - आमदार आदित्य ठाकरे

वाघनखावरुन राजकारण पेटले, बाळ म्हणारे भाजपाची हि नवीन संस्कृती आहे का...?

औरंगाबाद, दि.1(डि-24 न्यूज)

माझ्या टविटमुळे मुख्यमंत्र्यांना विदेश दौरा रद्द करावा लागला. विधानसभा अध्यक्ष यांचाही दौरा रद्द झाला आहे. आता राज्याचे उद्योगमंत्री लंडनच्या दौ-यावर जाणार असल्याचे कळाले, तेथे ते राऊंड टेबल चर्चा करणार आहेत म्हणे, जानेवारी पर्यंत तेथे वर्ल्ड एकाॅनाॅमिचे प्रतिनिधी येत नसतात मग हे कोणाबरोबर चर्चा करणार किती गुंतवणूक राज्यासाठी आणणार हे सांगावे. खारघरमध्ये जी घटना घडली त्याची रिपोर्ट अजून आली नाही पालकमंत्री म्हणून ते बघावे परदेशवारी करुन काय राज्याचे भले होणार आहे का...? जनतेच्या पैशातून परदेशी वा-या करु नये, सुट्टी घ्यायची खुशाल घ्या पण जनतेचे पैसे वाया घालवू नका अशी टिका सरकारवर आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

आयटोच्या परिषदेसाठी ते शहराच्या दौ-यावर आले आहे. चिकलठाणा विमानतळावर त्यांचे आगमन झाले त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांवर सुध्दा त्यांनी टिका केली. अतिवृष्टीमुळे विदेश दौरा रद्द केला म्हणे आणि वर्षा बंगल्यावर बाॅलिवूडच्या कलाकारांसोबत फोटो काढत होते. याठिकाणी मंत्रीमंडळ बैठकीत आले बांधावर गेले नाही शेतकऱ्यांचे पिकांची पाहणी केली नाही झू मध्ये गेले. तेथे आदित्य वाघाचे नाव ऐकूण मुख्यमंत्री घाबरले व त्यासोबत फोटो काढले. अशी टीका त्यांनी केली. राज्यात 

वाघंनखावरुन राजकारण पेटले असल्याचे दिसत आहे.

वाघनखावरुन आदित्य यांच्यावर टीका करत बाळ म्हटले त्यावर उत्तर देताना त्यांनी सांगितले माझ्या आजोबांच्या नावात बाळ आहे त्याचे मला अभिमान आहे. बाबासाहेबांचा दरारा भाजपाला माहिती आहे. याच बाळाने हादरुन सोडले. राहुल गांधी यांना पप्पू म्हटले त्याच पप्पूने भाजपाला सळो की पळो करून सोडले आहे. हिच का भाजपाची नवीन संस्कृती हे त्यांनी आपल्या मतदारांना दाखवून दिले. वाजपेयी व अडवाणी यांचा भाजपा आणि सध्याचा भाजपा यामध्ये अशा वक्तव्यावरुन फरक दिसत असल्याचे ठाकरे म्हणाले. वाघनखं खरे की खोटे स्पष्ट करावे, शिवभक्तांच्या भावनेशी खेळू नये. वाघनखं लोनवर येणार असा यांच्या जी आर मध्ये म्हटले आहे माग छत्रपती शिवरायांचे वाघनखे कायमची यावी त्यांचे मंदिर उभारले पाहिजे अशी आमची भूमिका आहे असे ठाकरेंनी स्पष्ट केले.

पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी मी पर्यटनमंत्री असताना अनेक निर्णय घेतले. पर्यटन विकासासाठी शंभर कोटी मिळावे यासाठी निर्णय घेतला. अजिंठा वेरूळ लेणी येथे छोटे विमानतळ उभारण्यात यावे अशी मागणी केंद्र सरकारकडे होती. 80 हाॅटेल्स उभारण्यासाठी लायसन्स मिळावे असा प्रयत्न होता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यापैकी दहा मिळाले. जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी काही निर्णयांना या सरकारने स्थगिती दिली ती उठवावी अशी मागणी आदित्य यांनी केली.

याप्रसंगी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवानी, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, बंडू ओक आदी उपस्थित होते.

चिकलठाणा विमानतळावर मोदींचे जुमले रथाचे व चाय पे चर्चा या सजवलेले रथाचे उद्घाटन आमदार आदित्य ठाकरे यांनी केले. जिल्हाप्रमुख राजूभाऊ राठोड यांनी हे रथ बनवले आहे. जी आश्वासने भाजपाने दिली होती ती पूर्ण झाली नाही, चाय पे चर्चा करुन जिल्ह्यातील जनतेला शिवसेनेच्या वतीने दाखवले जाणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow