उबाठाचे क्या हुवा तेरा वादा आंदोलन...भाजपा उबाठाचे कार्यकर्ते आमनेसामने

 0
उबाठाचे क्या हुवा तेरा वादा आंदोलन...भाजपा उबाठाचे कार्यकर्ते आमनेसामने

महायुती सरकारने शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन मत मिळवली...

शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप...

क्या हुआ तेरा वादा? आंदोलनास सुरुवात...

शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन...

उस्मानपुरा येथील भाजपा कार्यालयात मंत्री अतुल सावे यांना विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाला कार्यकर्ते गेले असता उबाठा व भाजपाचे कार्यकर्ते आमनेसामने येत घोषणाबाजी केली...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज) महायुती सरकारने शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन मत मिळवली असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास यांनी केला. "क्या हुआ तेरा वादा...? या जन आंदोलनास आज 5 जून पासून सुरुवात झाली असून शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांचे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

या निवेदनात महायुती सरकारने मोठ्या गाजावाजाने जाहीर केलेल्या अनेक योजना आणि दिलेली आश्वासने आज केवळ कागदावरच राहिली आहेत. यामुळे शेतकरी प्रचंड निराशेच्या गर्तेत ढकलली गेली असून, अनेक मूलभूत समस्यांनी डोके वर काढले आहे. याबद्दल शेतकऱ्यांचा तीव्र संताप व्यक्त करण्यासाठी शिवसेनेने हे आंदोलन सुरू केले असल्याची माहिती देण्यात आली..

सत्ताधारी तिन्ही पक्षांनी शेतकऱ्यांना लगोलग कर्जमाफी देण्याचा गाजावाजा केला, तसेच वेळेत कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा पत्ता नाही. सरकारने सरड्याला लाजवेल इतका वेगाने रंग बदलला. कर्जमाफीच्या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक वर्ष संपत आले असताना अर्थमंत्री अजित पवारांनी त्यांची क्रूर थट्टा केली. याचाच परिणाम म्हणून, गेल्या सात महिन्यांत राज्यात 1 हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. शेतकऱ्यांच्या मार्फत राज्याच्या तिजोरीत जाणारा जीएसटी अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना परत करण्याच्या बाता मारल्या, मात्र जीएसटी अद्याप शेतकऱ्यांच्या वाट्याला आलाच नाही. सोयाबीन आणि कापसाचे भाव पाडण्यासाठी परदेशातून हे पीक आयात करण्याचे फतवे काढले जात आहेत. शेतकरी सन्मान योजनेची रक्कम 12 हजारांवरून 15 हजार रुपये करण्याचे आश्वासन केवळ 'बाजार गप्पा' ठरल्या आहे.

शेतमाल खराब न होण्यासाठी शीतगृहे देण्याचे बोलले, पण आज पावसाने खराब झालेल्या पिकाचे नुकसानही सरकारला उघड्या डोळ्याने दिसेनासे झाले आहे. हमीभावाची 'दीडपट' भूलथाप ही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी आहे. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखे आहे. सरकार फक्त कागदावर आकडेवारीचा खेळ करते आणि प्रत्यक्षात अन्नदात्याला वाऱ्यावर सोडून, त्याच्या जखमेवर मीठ चोळत आहे.

'एक रुपयात पीकविमा' योजनेची घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली. ती योजना आता बंद केली असून, विमा कंपन्यांनी दीड लाख कोटींपेक्षा जास्त प्रीमियम गोळा करून 50 हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम स्वतःच्या खिशात घातली आहे. मात्र, शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई सोडाच, साधे पंचनामेही झालेले नाहीत. 45 हजार गावांमध्ये पाणंद रस्ते देण्याची घोषणा केवळ कागदावरच राहिली. शेतकऱ्यांचे हाल अजूनही तसेच आहेत, कारण आश्वासनांची पूर्तता कधी होणार हे कुणालाच माहित नाही. "अन्नदाता बनेल ऊर्जादाता" ही योजना केवळ एक निव्वळ धूळफेक आहे. आजही अनेक शेतकरी लोडशेडिंगने त्रस्त आहेत. सबसिडीचे आकडे मोठे असले तरी ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, आणि 'ऊर्जादाता' बनण्याऐवजी 'अन्नदाता' आजही अंधारातच आहे. 'हर घर जल, हर घर छत' या योजनांच्या माध्यमातून मोठी स्वप्ने दाखवली खरी, पण अंमलबजावणीतील त्रुटी, भ्रष्टाचार आणि दिरंगाईमुळे जनतेची घोर निराशा झाली आहे. घोषणा करून दिशाभूल करण्याऐवजी, सरकारने या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा हे केवळ 'जुमले' ठरतील अशी भीती व्यक्त होत आहे.

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाची उपेक्षा हे या सरकारचे एक मोठे अपयश आहे. 2018 पासून 40 ते 45 हजार कोटींचा हा प्रकल्प केवळ कागदावरच रेंगाळत आहे, तर मराठवाडा आजही टँकरच्या पाण्यावरच तग धरून आहे. निधीचा अभाव, राजकीय इच्छाशक्तीची कमतरता आणि अंमलबजावणीतील दिरंगाई यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केवळ घोषणांचा पाऊस ठरला असून, मराठवाड्याची तहान कायम आहे.

'बहिणीचे लाड' हा केवळ फास ठरला आहे. लाडक्या बहिणींना वाढीव रक्कम सोडाच, पण आहे ती रक्कमही वेळेत देण्यास सरकार तयार नाही. तब्बल आठ लाख महिलांच्या लाभावर फुली मारून सरकारने विश्वासघात केला आहे. 'उज्वला गॅस योजना' कोणत्या अडगळीत पडली आहे, हे सरकारलाही माहिती नाही. 'दीड हजार देतो ना.. मग काही मागू नका..' अशा अविर्भावात मंत्री वागतात, तर मग महिलांनी सुरक्षा पण मागू नये का ? सरकारी आकडे सांगतात की महाराष्ट्रातून दररोज 70 महिला बेपत्ता होतात. 2023 साली 7521 बलात्काराच्या घटनांची नोंद झाली, तरी महिला आयोगाची दातखीळ बसलेली आहे. 25 हजार महिलांची पोलीस भरती करण्याचे 'नकली' आश्वासनही हवेतच विरल्याचे या पत्राद्वारे सरकारला लक्षात आणून दिले आहे. 

या सरकारने वृद्धांची ही फसवणूक केली. पेन्शनमध्ये वाढ करून 2100 रुपये देण्याचे आणि सरकारी दवाखान्यात स्वतंत्र बाह्य रुग्ण कक्ष देण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. मात्र, आज एकही बाह्य रुग्ण कक्ष सुरू झालेला नाही, उलट महिलांच्या रस्त्यावर होणाऱ्या प्रसूती ही सामान्य बाब बनली असल्याचे या पत्रात अधोरेखित केले आहे.

25 लाख नोकऱ्या आणि 10 हजार विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्याचे आश्वासन दिले होते, पण प्रत्यक्षात ना नोकऱ्या मिळाल्या ना विद्यावेतन, 'छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र' आणि एरोनॉटिकल हबची स्वप्ने दाखवून तरुणाईला उल्लू बनवले आहे, ज्यामुळे आज फक्त भयंकर बेरोजगार निर्माण झाल्याचे चित्र दिसत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. 

या निवेदनातून आम्ही शासन आणि प्रशासनाचे लक्ष राज्यातील, विशेषतः मराठवाड्यातील, या गंभीर आणि मूलभूत समस्यांकडे वेधत आहोत. केवळ पोकळ आश्वासने आणि घोषणाबाजी करण्याऐवजी, सरकारने तात्काळ या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि राज्यातील जनतेला न्याय द्यावा. अन्यथा, जनतेचा असंतोष उद्रेक करेल, याची गंभीर दखल घ्यावी, असे सूचित करण्यात आले आहे. 

याप्रसंगी महानगरप्रमुख राजू वैद्य, उपजिल्हाप्रमुख किशोर कच्छवाह, विजय वाघमारे, चंद्रकांत गवई, संतोष जेजुरकर, संतोष खेंडके, अरविंद धिवर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात,हरीभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी, दिग्विजय शेरखाने, शहर संघटक सचिन तायडे, उपशहरप्रमुख प्रमोद ठेंगडे, नितीन पवार, राजेंद्र दानवे, दिनेशराजे भोसले, संदेश कवडे, संजय हरणे, सुरेश गायके, जयसिंग होलीये, प्रकाश कमलानी, कृष्णा मेटे, बापू कवळे, राज निळ, बापू पवार , मंगेश भाले, पुरुषोत्तम पानपट, उपतालुकाप्रमुख विष्णु जाधव, गणेश नवले, महेंद्र खोतकर, माजी नगरसेवक आत्माराम पवार, कमलाकर जगताप, विभागप्रमुख रघुनाथ शिंदे, नंदू लबडे, संतोष बारसे, गोरख सोनवणे, भास्कर खेडके, सोपान बांगर, दुर्गादास देशपांडे, संजीवन सरोदे, सुनील कडवे, शाखाप्रमुख कैलास तीवलकर, साईनाथ जाधव, सिद्धार्थ वडमारे, रामेश्वर मानकापे, अमोल देशमुख, मयूर तुपे, पवन गावंडे, गणेश वैष्णव, देविदास पवार, राहुल गोडबोले, निवृत्ती पळसकर, प्रसाद चौधरी, राम केकान, शरद जायभाय, सूर्यकांत सूर्यवंशी, बाबुलाल बीजारने, नानासाहेब रणयेवले, चंद्रकांत देवराज, सुनील माहुरे, काकाजी जीवराज, अनिल जाधव, विनोद दाभाडे, राजेश सक्सेना, यशवंत चौधरी, सुदाम भंडे, सतीश उदावंत, नितीन चरभरे, प्रकाश जंगम, संदीप डोईफोडे, अभिषेक दाभाडे, अभिषेक दाभाडे, सतीश हिवाळे, संतोष चंदन, नामदेव सांगाडे, त्र्यंबक जगताप, कचरू साळे, महिला आघाडी सहसंपर्क संघटक दुर्गा भाटी, जिल्हा संघटक आशा दातार, जिल्हा समन्वयक विद्या अग्निहोत्री, महानगर संघटक सुकन्या भोसले, मीना फसाटे, शहर संघटक सुनिता सोनवणे, विधानसभा संघटक मीरा देशपांडे, राजश्री राणा, उपशहर संघटक शोभा साबळे, नुसरत जहाँ, कविता मठपती, विजया पवार, सुचेता आंबेकर, लता शंखपाळ, पद्मा तुपे, पुष्पा नलावडे, नंदा वाघ, वंदना कुलकर्णी, राजश्री पोफळे, बबिता रणयेवले, छाया देवराज, सरस्वती सोनवणे, रुपाली मुंदडा, रोहिणी पिंपळे व कोमल पांढरे उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow