शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
संपर्क कार्यालयात आशिर्वाद आणि शुभेच्छासाठी नागरिकांची गर्दी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.1 (डि-24 न्यूज) - हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण ही शिकवण दिली आहे. या शिकवणीनुसार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आपला वाढदिवस सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांनी साधेपणाने साजरा केला. यावेळी मच्छलीखडक येथील संपर्क कार्यालयात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आशिर्वाद व शुभेच्छांसाठी गर्दी केली.
यामध्ये प्रामुख्याने आरोग्य शिबिर, अन्नदान, गरजूंना ब्लँकेट वाटप, गोशाळेत चारा वाटप, कीर्तन आदी कार्यक्रम आठवडाभर होणार आहेत. बुधवारी सकाळी 9 वाजता खडकेश्वर महादेव मंदिर येथे महारुद्र अभिषेक, गुरुगणेश गोशाळा बेगमपुरा येथे शिवसेना शाखेच्या वतीने चारावाटप, 10 वाजता गुलमंडी येथील गोरक्षक गोशाळेत चारा वाटप, सकाळी 11 वाजता घाटी रुग्णालयात अन्नदान व फळवाटप, युवासेना तालुका युवाधिकारी ऋषिकेश धाट यांच्यातर्पेâ गंगापूर येथे ब्लँकेट आणि फळवाटप करण्यात आले. राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेत शैक्षिणक, क्रीडा स्पर्धा, दादोजी कोंडदेव महाविद्यालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. माजी नगरसेवक वीरभद्र गादगे यांच्या वतीने आविष्कार चौकात लाडुतुला करण्यात आला. शुक्रवार, 3 रोजी सकाळी 9 वाजता राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेत खो-खो स्पर्धा आणि शनिवारी 4 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेत कबड्डी स्पर्धा, 5 जानेवारी रोजी मातोश्री वृद्धाश्रमात अन्नदान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तिरुपती बालाजी येथे भोजनदान
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त तिरुपती बालाजी येथे भोजनदान करण्यात येते. शिवसेना महिला आघाडीच्या उपशहर संघटक प्रतिभा राजपूत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने या महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच वाढदिवस साजरा करण्या
त आला.
What's Your Reaction?






