तुम्ही म्हणता सिल्लोडला येईल मी येथे येऊन गुडगिरी संपवणार - आमदार अब्दुल सत्तार यांचा विरोधकांना इशारा

 0
तुम्ही म्हणता सिल्लोडला येईल मी येथे येऊन गुडगिरी संपवणार - आमदार अब्दुल सत्तार यांचा विरोधकांना इशारा

तुम्ही म्हणता सिल्लोडला येईल मी येथे येऊन गुंडगिरी संपवणार - आमदार अब्दुल सत्तार यांचा विरोधकांना इशारा

सांस्कृतिक मंडळावरील मैदानावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जनसागर उसळला.... जिल्हा व राज्यातील दिग्गज नेते शुभेच्छा देण्यासाठी हजर....

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज) सिल्लोडला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सिल्लोडला येऊन गुंडगिरी संपवण्याची भाषा बोलली जात आहे आता मी छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) येथे बस्तान बांधून गुंडगिरी संपवणार आहे. जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवणार. नाले जसजसे खडखड करत आहे असे काही जण खडखड करत आहे जे व्यासपीठावर उपस्थित आहेत ते आसमान आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे. हि मंडळी सर्व राजकीय पक्षातील नेते आहेत त्यांचे समाजात मोठे स्थान आहे मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते दूर दुरुन आले अशी दोस्ती टिकवण्यासाठी मी आपल्या राजकीय जीवनात प्रमाणिक प्रयत्न केले. जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत शिवसेनेत राहणार जेव्हा विश्वास संपेल त्यावेळी जनतेशी चर्चा करून पुढचा निर्णय घेईल. पद येते जाते, सत्ता येते जाते पण मी पुन्हा येईन असे विधान आपल्या नागरी सत्काराला उत्तर देताना सांस्कृतिक मंडळावरील मैदानावर आयोजित कार्यक्रमात आमदार अब्दुल सत्तार यांनी केले.

जिल्ह्यातील विविध पक्षातील लोकप्रतिनिधी, नेते व पदाधिकारी यांच्या समीतीच्या वतीने माजीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार व अभिष्टचिंतन सोहळा मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, धुळे व विविध जिल्ह्यांतून त्यांच्या चाहत्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लोकनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

व्यासपीठावर खासदार डॉ.कल्याण काळे, भाऊसाहेब ठोंबरे, सुधाकरदादा सोनवणे, विनोद पाटील तांबे, कृष्णा पाटील डोणगावकर, किरण पाटील डोणगावकर, डॉ.दिलावर बेग यांनी शुभेच्छा संदेश देत आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्रमुख उपस्थिती माजी आमदार सुरेश जेथलिया, अभिजित देशमुख, डॉ.दिनेश परदेशी, एड कमरोद्दीन, हाजी अकीलसेठ, रविंद्र काळे, राजु राठोड, बाळूसेठ संचेती, जगन्नाथ खोसरे, गोकुळसिंग राजपूत, सतीश बोरसे, रामुकाका शेळके, अर्जुन गाढे पाटील, अविनाश गलांडे, किशोर बलांडे, प्रमोद जगताप, फेरोज पटेल, श्रीराम महाराज, संजय जगताप, इब्राहिम पटेल, अज्जू रहीम नाईकवाडी, युसुफ अन्सारी, फेरोज खान आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे बोलताना अब्दुल सत्तार आपल्या भाषणात म्हणाले काही लोक धर्माच्या नावाने राजकारण करतात काही लोक म्हणतात सिल्लोडला येणार एकाला घरी बसवले आता दुसरा येत आहे असा टोला संजय सिरसाट यांचे नाव न घेता त्यांनी लगावला. पण मी संभाजीनगरला(औरंगाबाद) येईल व गुंडगिरी संपवणार असा विश्वास व्यक्त केला.

"कुछ देर तक खामोशी है, फिर कानो मे शोर आयेगा, तुम्हारा तो सिर्फ वक्त है हमारा दौर आयेगा" असा शेर म्हणत विरोधकांना त्यांनी इशारा दिला.

जोपर्यंत माझ्यावर एकनाथ शिंदे यांचा विश्वास आहे त्यांचाच राहणार कोठेही जाणार नाही असे सांगत मंत्री पद न मिळाल्यानंतर अब्दुल सत्तार काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते त्यास त्यांनी आज उत्तर देत आपली भुमिका स्पष्ट केली.

या मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा गाजल्या त्या सभांची वर्षभर चर्चा राहायची परंतु मी एक साधा कार्यकर्ता माझ्या प्रेमापोटी मैदान भरले आहे याची परतफेड जनसेवा करुन फेडणार. मला पाच वर्षे मंत्री म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. पुढील अडीच वर्षात काय होईल सांगता येणार नाही राजकारणात त्या गोष्टी पूर्ण होत नाही फक्त आश्वासन दिले जातात मलाही त्याची जाणीव आहे. माझ्या नेत्यांनी सर्वांना सांगितले अडीच वर्षे हे राहतील तुम्हाला थांबावे लागेल. मी चार वेळा मंत्री झालो. मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलो तेथील सर्व जागा महायुतीचे निवडून आल्या हा पण इतिहास आहे. हिंगोली, छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), धुळे जिल्ह्यातील सर्व जागा या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री बणवले हा माझा बहुमान होता. माझ्या नेत्यांनी मला ऐतिहासिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली यामुळे त्यांचे आभार. या कार्यक्रमात आलेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करत क्रेनने मोठा हारने आमदार अब्दुल सत्तार यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. फेटा बांधून डॉ.कल्याण काळे यांनी सत्कार केला. तर चांदीची तलवार देऊन त्यांचा यावेळी सत्कार करण्या

त आला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow