जिल्हास्तरीय तबलिगि इज्तेमा, वाहतूक मार्गात बदल

 0
जिल्हास्तरीय तबलिगि इज्तेमा, वाहतूक मार्गात बदल

तबलिगि इज्तेमा, वाहतूक मार्गात बदल...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज):- मौजे रायपूर शिवार येथे उमुमी इस्तेमा इन्तेजामीया कमेटी (ता. गंगापूर व खुलताबाद) यांनी जिल्हास्तरीय मुस्लिम धार्मिक तबलीगी इज्तेमा कार्यक्रम दि.3 ते 5 दरम्यान आयोजीत करण्यात आला आहे. या कालावधीत या भागात भाविकांची ये-जा असेल. त्यामुळे कसाबखेडा फाटा ते देवगाव रंगारी, लासूर ते रायपूर तसेच कसाबखेडा फाटा ते शिऊर बंगला या भागातील रहदारी सुरळीत रहावी यासाठी वाहतुक मार्गात खालील प्रमाणे बदल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिले आहेत.

वाहतूक मार्गावरील बदल याप्रमाणे – 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) ते देवगाव- शिऊर बंगला मार्गे वैजापूर- येवला- नाशिककडे जाणारी जड वाहतुक- 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) – ए.एस.क्लब - लासुर – वैजापूर मार्गे पुढे येवला नाशिकडे जातील.

 छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)– ए.एस.क्लब – करोडी टोल नाका – समृद्धी महामार्ग मार्गे वैजापूर – येवला नाशिकडे जातील.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद )– ए.एस.क्लब – करोडी टोल नाका – कसाबखेडा फाटा – गल्लेबोरगाव फाटा – देवगाव रंगारी - शिऊर बंगला मार्गे पुढे जातील.

नाशिक- येवला-वैजापूर- शिऊर बंगला- देवगाव रंगारी मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे (औरंगाबाद )येणारी जड वाहतुक-

नाशिक – येवला – वैजापूर – लासूर – ए.एस.क्लब मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे येईल.

 नाशिक – येवला – वैजापूर – समृद्धी महामार्ग मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे जातील.

 नाशिक – येवला – वैजापूर – शिऊर बंगला – देवगाव रंगारी – गल्लेबोरगाव मार्गे कसाबखेडा फाटा – छत्रपती संभाजीनगर कडे जातील.

वाहतुक मार्गातील बदल हे दि.3 चे सकाळी 8 ते दि.5 चे मध्यरात्रीपर्यंत अंमलात राहतील, असे पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी कळविले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow