शनिवार पासून सिध्दार्थ जलतरण तलाव सुरू होणार
 
                                शनिवार पासून सिद्धार्थ जलतरण तलाव सुरू होणार...
औरंगाबाद, दि.19(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या वतीने दिनांक 17 जुलै पासून फिल्टर दुरुस्ती करिता सिद्धार्थ जलतरण तलाव बंद ठेवण्यात आला होता.
मुख्य उद्यान अधिकारी यांच्या प्राप्त माहिती नुसार आता सिद्धार्थ जलतरण तलावाचे फिल्टर दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून दिनांक 21 ऑक्टोबर शनिवार पासून सर्व सभासदांसाठी सिद्धार्थ जलतरण तलाव पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे.
तसेच मासिक, त्रीमासिक व वार्षिक सभासदांचा बंद दरम्यानचे उर्वरित कालावधी जलतरण तलाव पूर्ववत सुरू झाल्याच्या दिनांक पासून वाढवून देण्यात येणार आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            