वक्फ बोर्डाचा मुस्लिम समाजाला होत आहे का फायदा
वक्फ बोर्डाचा मुस्लिम समाजाला होत आहे का फायदा, वक्फ मुक्ती आणि संरक्षण फोर्स
औरंगाबाद, दि.19(डि-24 न्यूज) वक्फ बोर्डाची राज्यात हजारो एकर जमीन आहे. अनेक जागेवर अवैध अतिक्रमण करण्यात आले आहे. उत्पन्नात वाढ होताना दिसत नाही तर जे काही कामकाज सुरू आहे त्यामध्ये विविध कागदपत्रे काढले तर भरमसाठ शुल्क आकारले जात आहे. अनेक जमिनींवर अवैध अतिक्रमण करण्यात आले आहे त्या जमिनीवर कडक कारवाई करावी व जमीन वक्फ बोर्डाने आपल्या ताब्यात घ्यावी व त्या जमिनिंचा फायदा मुस्लिम समाजाला व्हावे असा कृती आराखडा तयार करावे. बोर्डाच्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय आवश्यक आहे. वक्फ बोर्डाच्या स्थापनेचा उद्देश समाजाला सार्थक होत आहे का याबाबत गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. समाजाला वक्फ बोर्डाच्या जागेवर अत्याधुनिक रुग्णालये, महाविद्यालय, कौशल्य विकास केंद्र, महिला महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज, खेळाचे क्रीडांगण, शाळा, मदरसे, हस्तकला केंद्रे, यांसह विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती कार्यक्रमाची गरज आहे.
वक्फ मालमत्तेचे रक्षण केले पाहिजे असे सरकारचे स्पष्ट आदेश असताना हे मंडळ मुस्लिमांना सशक्त करण्याऐवजी अशक्तिकरण करताना दिसत आहे. वक्फ मंडळाचे कोट्यावधी रुपयांची मालमत्ता दुस-यांच्या ताब्यात आहे. बोर्डात उच्चशिक्षित असताना सुध्दा समाजाचे भले होत नाही असे निवेदन आज वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व सविस्तर चर्चा केली. वक्फ मुक्ती आणि संरक्षण टास्क फोर्सच्या वतीने अध्यक्ष सलिम मुल्ला यांनी दिले आहे.
निवेदनावर एक.जे.खान, मोईन इनामदार, सय्यद फरहान, उस्मान शेख, फैजान इनामदार, युसुफ मनियार, शेख इम्रान आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?