युवकाने फाशी घेऊन जीवन संपवले, मराठा आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा
22 वर्षीय तरुणाची मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या
कोलठाणवाडी- पोखरी येथे तणाव
औरंगाबाद, दि.31 (डि-24 न्यूज) - हर्सूल जवळील कोलठाणवाडी येथील 22 वर्षे तरुणाने पोखरी शिवारातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली, या घटनेने खळबळ उडाली असून मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय प्रेत खाली उतरू देणार नाही अशी संतप्त भूमिका जमावाने घेतली. त्यामुळे पोलीस आणि महसूल प्रशासनातील अधिकारी दुपारपर्यंत घटनास्थळी ठाण मांडून होते.
शुभम अशोक गाडेकर (वय 22) रा.कोळठाणवाडी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. शुभम हा रात्री घराबाहेर पडला. शेतात गेला असेल म्हणून कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला नाही ,मात्र पोखरी शिवारात एका लिंबाच्या झाडाला त्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत तो सकाळी आढळून आला. नागरिकांना ही घटना कळतात त्यांनी फुलंब्री पोलीस ठाण्याची संपर्क साधला. तोपर्यंत अवतीभवतीच्या दोन-चार खेड्यातील मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमला. मराठा आरक्षणासाठीच शुभमने आत्महत्या केल्याचा दावा त्यांनी केला आणि जोपर्यंत मराठा आरक्षण घोषणा करत नाही तोपर्यंत मृतदेह खाली उतरू देणार नाही असा हट्ट धरला. दुपारी 12 वाजेपर्यंत मृतदेह झाडावर तसाच होता. प्रशासनाने नातेवाईकांची समजूत काढली. या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
What's Your Reaction?