मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमानतळावर आगमन व स्वागत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन व स्वागत
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज):- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सकाळी 11 वा 50 मि. नी येथील विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचेही आगमन झाले. प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आदी उपस्थित होते. येथून ते हेलिकॉप्टरने बुलडाणाकडे रवाना झाले
.
What's Your Reaction?