आरोग्यम फिजिओथेरपी क्लिनिकचे उद्घाटन, नविन तंत्रज्ञानाने दूर होतील व्याधींवर उपचार
आरोग्यम फिजिओथेरपी क्लिनिकचे उद्घाटन, नविन तंत्रज्ञानाने दूर होतील व्याधींवर उपचार
औरंगाबाद, दि.8(डि-24 न्यूज) अॅक्टिव्ह फिजिओ कायरोप्रंक्टिक या नवीन तंत्रज्ञानामुळे अनेक आजारांपासून आराम मिळणार आहे. आकाशवाणी भारतीया हाॅस्पीटल आवारात आज आरोग्यम फिजिओथेरपी क्लिनिकचे उद्घाटन आज पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांच्या हस्ते करण्यात आले आहे. त्यांनी स्वतः या फिजिओथेरपीचा अनुभव घेत फिट राहण्यासाठी व विविध आजारांवर रामबाण उपाय म्हणून या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग शरीर फिट राहण्यासाठी करावे असे आवाहन केले आहे.
संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, टाच दुखी, टेनिस एल्बो, सायटिका, पॅरालिसिस, फ्रोझन शोल्डर, फेशियल पाल्सी, सबम्युकस फायब्रोसिस, ऑपरेशन नंतर स्नायु व सांध्यांमध्ये येणारा कडकपणा या आजारांपासून सुटका करण्यासाठी फिजिओथेरपी केल्यास आराम मिळेल अशी माहिती डि-24 न्यूजला डॉ.मुश्ताक सय्यद B.P.T.,OMT(Chiropractic and Osteopathy) यांनी दिली आहे. यावेळी डॉ.भारतीया व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ.मुश्ताक यांचे अभिनंदन केले.
What's Your Reaction?