औरंगाबाद विभाग, जिल्हा, तालुका, गावाच्या नामांतरावर 29 सप्टेंबर रोजी सुनावणी

 0
औरंगाबाद विभाग, जिल्हा, तालुका, गावाच्या नामांतरावर 29 सप्टेंबर रोजी सुनावणी

औरंगाबाद विभाग जिल्हा तालुका गावाच्या नामांतरावर 29 सप्टेंबर रोजी सुनावणी 

मुंबई,दि.25(प्रतिनिधी) औरंगाबाद विभाग, जिल्हा, तालुका, गावाच्या नामांतरावर 29 सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे अशी माहिती याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी यांनी डि-24 न्यूजला दिली आहे. 

त्यांनी पुढे सांगितले औरंगाबाद शहर नामांतरावर 4 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

15 सप्टेंबर रोजी राज्य सरकारने गॅजेट काढत औरंगाबाद विभाग, औरंगाबाद जिल्हा, औरंगाबाद तालुका, औरंगाबाद गावाचे नाव बदल करून छत्रपती संभाजीनगर केल्याची घोषणा केली. नवीन नामकरण बोर्डाचे उद्घाटन 16 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयात या नामांतराच्या नोटीफिकेशनला आता आव्हान देण्यात आले आहे, हि याचिका मोहंमद हिशाम उस्मानी व संजय वाघमारे यांनी दाखल केली आहे. आता न्यायालयाने सुनावणी साठी तारीख दिल्याने न्याय मिळेल असा विश्वास मोहंमद हिशाम उस्मानी यांनी व्यक्त केला आहे. भारत सरकार, राज्य सरकार, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना पार्टी बनवण्यात आले आहे. जेष्ठ विविज्ञ अॅड एस.एस.काझी यांच्या मार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे व त्यांचे अस्सिटेंट अॅड. मोईन शेख, अॅड. अक्रम हे काम पाहत आहे. शहराच्या नामांतर विरोधात 4 ऑक्टोबर 2023 रोजी सुनावणी होणार आहे. शहराच्या सुनावणी अगोदर औरंगाबाद विभाग जिल्हा तालुका गावाच्या नामांतरावर सुनावणी होणार असल्याने देशाचे लक्ष याकडे लागले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow