"एआय" तंत्रज्ञानाशी करा मैत्री - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

‘एआय’ तंत्रज्ञानाशी करा मैत्री; जिल्हाधिकारी...
कार्यालयातील प्रशिक्षणात एआयचे धडे
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.5 (डि-24 न्यूज)- कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय या तंत्रज्ञानाशी मैत्री करा. ही मैत्री नक्कीच आपल्या फायद्याची आहे. यामुळे आपले श्रम, वेळ वाचून आपल्या कामात अचूकता आणता येते, असे प्रतिपादन विनायक कदम यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सप्ताहानिमित्त ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणिसुयोग्य माहिती तंत्रज्ञानाचा प्रशासनातील वापर’, या विषयावर प्रशिक्षण पार पडले. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे पुणे व उत्तर महाराष्ट्र विभागाचे विभागीय व्यवस्थापक विनायक कदम यांनी या प्रशिक्षणात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, डॉ. सुचिता शिंदे, नीलम बाफना तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांना एआय तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याविषयी आवाहन केले. हे तंत्रज्ञान आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहे. त्याचा अंगिकार करणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठीच या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा सर्व कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा.
विनायक कदम यांनी एआयच्या विविध उपयोगी ॲप विषयी आपल्या सादरीकरणात माहिती दिली. एआय प्रणालीचा इतिहास समजावून सांगितला. तसेच त्याच्या विविध ॲप विषयी प्रात्यक्षिक दाखवून माहिती दिली. एआय हा अत्यंत विश्वासू मित्र असून त्यास योग्य त्या पद्धतीने सुचना देता यायला हव्या. ते तंत्र शिकायला हवे. जिवनाच्या विविध क्षेत्रात एआय चा वापर होत आहे. एआय आपल्या दैनंदिन जीवनात खूप ठिकाणी उपयोगी ठरत आहे. आपल्या कळत न कळत उपयोग होत आहे. प्रशासनात एआय चा वापर केल्यास अधिकाधिक लोकाभिमुख प्रशासन राबविता येईल,असेही त्यांनी सांगितले.
What's Your Reaction?






