म्हाडा तर्फे सदनिकांसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन...

 0
म्हाडा तर्फे सदनिकांसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन...

म्हाडातर्फे सदनिकांसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन...

26 सप्टेंबर रोजी लॉटरीची सोडत...

मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांची माहिती...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5 (डि-24 न्यूज) : छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे सोडत जुन-२०२५ अन्वये १३४१ निवासी सदनिका भुखंड व नाशिक मंडळातील ६७ सदनिका असे १४०८ सदनिका भुखंडाची जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या जाहिरातीच्या अनुषंगाने अर्जदारांना 31 ऑगस्ट, 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अनामत रकमेचा भरणा करून ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. प्राप्त होणाऱ्या अर्जांची 26 सप्टेंबर, 2025 रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे सोडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांनी दिली. 

छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कार्यकारी अभियंता नितीन शिंदे,उपमुख्य अधिकारी श्री. जयकुमार नामेवार

उपस्थित होते. 

छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे सोडत जुन-२०२५ अन्वये १३४१ निवासी सदनिका भुखंड व नाशिक मंडळातील ६७ सदनिका असे १४०८ सदनिका भुखंडाची जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १०५६ सदनिका अत्यल्प उत्पन्न गट नक्षत्रवाडी छत्रपती संभाजीनगर व २४४ पैकी ९२ सदनिका अत्यल्प उत्पन्न गट अंबाजोगाई जि.बीड या योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत रु.२.५०/-लक्ष इतके अनुदान अर्जदारांना प्राप्त होणार आहे. त्यामुळे रु.१०.००/-लक्ष ते रु.१२.५०/- लक्ष या किंमतीत १ बीएचके सदनिका घेण्याची सुवर्णसंधी प्राप्त झालेली आहे. अर्जदारांना अंदाजित डिसेंबर-२०२६ पर्यंत या सदनिकांचा ताबा मिळणार आहे. 

छत्रपती संभाजीनगर शहराच्या अत्यंत मोक्याचे ठिकाण असलेल्या चिकलठाणा येथे म्हाडा योजनेअंतर्गत १५४ सदनिकांचा सोडतीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ही योजना जालना रोड पासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे रु.२७.००/- लक्ष ते रु.३४.००/- लक्ष या परवडण-वा किंमतीत अर्जदारांना २ बीचके सदनिका घेता येणार आहेत. या योजनाचा ताबा अर्जदारांना डिसेंबर-२०२५ पर्यंत देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या २०% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत विविध योजनेतील बीड बायपासलगत सातारा परिसर व देवळाई येथील २१ सदनिका व १८ निवासी भुखंडाचा समावेश करण्यात आलेला आहे. अर्जदारांना रु.१५.००/- लक्ष या किंमतीत सदनिका तसेच रु.५.००/- लक्ष या किमतीत भुखंड घेण्याची संधी उपलब्ध आहे.  

या जाहिरातीच्या अनुषंगाने अर्जदारांना 31 ऑगस्ट, 2025 रोजी रात्री. ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अनामत रक्कमेचा भरणा करुन ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. त्यानुसार प्राप्त होणाऱ्या अर्जाची दि. २६ सप्टेंबर, २०२५ रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे सोडत काढण्यात येणार आहे.

अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता https://housing.mhada.gov.in किंवा https://www.mhada.gov.इन या संकेतस्थळास भेट द्यावी. या सोडतीकरिता मंडळातर्फे हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आलेले असून अर्ज नोंदणीकरिता - ०२२-६९४६८१००. ऑनलाईन पेमेंट करिता- १८००८९१८२९७,७०६६०४७२१२, support@easebuzz.in यावर संपर्क साधता येणार आहे. या सोडतीकरिता मंडळाने आपल्या विभागीय कार्यालयात तळमजल्यावर विशेष मदत कक्ष स्थापन केला आहे.

मंडळातर्फे मराठवाडयाच्या विविध जिल्ह्यातील ५२ अनिवासी भुखंड ज्यामध्ये सुविधा भुखंड, रहिवासी भुखंड, सोयीचे दुकाने समावेश करुन जुन-२०२५ ई-ऑक्शन (ई-लिलाव) जाहिर करण्यात आला होता. त्यानुसार अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांक ०१/०८/२०२५ रोजीपर्यंत ११५ अर्जदारांनी अनामत रक्कम भरुन या ई-ऑक्शन मध्ये सहभाग घेतलेला आहे. लवकरच ऑनलाईन पध्दतीने हा लिलाव काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow