ओबीसी महिलांना सुध्दा राजकीय आरक्षण मिळावे, राज्यात हवे मंत्रीपद - रामदास आठवले

 0
ओबीसी महिलांना सुध्दा राजकीय आरक्षण मिळावे, राज्यात हवे मंत्रीपद - रामदास आठवले

ओबीसी महिलांना आरक्षण मिळावे, राज्यात हवे मंत्रीपद- रामदास आठवले

चंद्रयान- 3 मोदींमुळे यशस्वी , दलित -मुस्लिम समाजावर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना करावी, राज्यात एक मंत्रीपद व विधानसभा निवडणुकीत 42 जागा हवी, मराठा समाजाला मिळावे आरक्षण, 14 ऑक्टोबर रोजी दलित पँथर सुवर्णमहोत्सवी वर्ष कार्यक्रम औरंगाबाद शहरात,

अल्पसंख्याक मुस्लिम विद्यार्थ्यांना केंद्राची स्काॅलर्शिप मिळत नसल्याने केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री स्मृती इराणी यांच्या चर्चा करून प्रश्न सोडवला जाईल...

औरंगाबाद, दि.24(डि-24 न्यूज)

19 सप्टेंबर रोजी गणपती उत्सवाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसदेचे उद्घाटन केले. या संसदेत महिला आरक्षणाचे विधेयक दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाले. विरोधकांनी या विधेयकाला पाठिंबा दिला पण काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला पण ओबीसी महिला आरक्षणाची मागणी केली. काँग्रेस ओबीसींना आरक्षण मिळावे यासाठी सत्ता होती तेव्हा निर्णय घेतला नाही. अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

आरपिआयची भुमिका आहे की ओबीसी महिलांना सुध्दा लोकसभा व विधानसभेत आरक्षण मिळावे या विधेयकात सुधारणा करून निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. चंद्रयान -3 साठी इस्त्रोला भारत सरकारने 13500 कोटी निधी दिला. आपला देश जगात चौथा देश बनला जो चंद्रावर गेला याची स्तुती जगात सुरू आहे. पाकिस्तानी जनतेने सुध्दा चंद्रयानबद्दल भारताची स्तुती केली आहे. चंद्रयान - 3 यशस्वी करण्यासाठी वैद्यानिकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही वाटा आहे याबद्दल विरोधक टिका करत आहे असे आठवले म्हणाले.

दलित मुस्लिम अत्याचारांवर राज्य सरकारने उपाययोजना करत मुख्यमंत्र्यांनी होणा-या घटनांचा आढावा घ्यावा अशी मागणी केली.

मराठा व मुस्लिम समाजातील गरजूंना आरक्षण मिळावे यासाठी सरकारने कायदेशीर अभ्यास करून निर्णय घ्यावा.

राज्यात आमचा विस्तार होण्या अगोदर अजित पवारांचा विस्तार झाला असा टोला त्यांनी लगावला. त्यांनी मागणी केली राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर एक मंत्रीपद आरपिआयला मिळावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बदलले जातील यावर त्यांनी सांगितले हि अफवा आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका महायुती त्यांच्या नेतृत्वाखाली लढवले जातील. आरपिआयला विधानसभा निवडणुकीत 42 जागा मिळायला हवी अशी मागणी त्यांनी केली.

दिल्लीचे खासदार रमेश विधुरी यांनी नवीन संसदेत बासपाचे लोकसभा सदस्य कुंवर दानिश अली यांच्या बद्दल जे वक्तव्य केले हा प्रश्न डि-24 न्यूजने विचारला असता ते म्हणाले खासदारांनी या पवित्र संसदेत अशा प्रकारे वक्तव्य करणे योग्य नाही. भाजपाने विधुडी यांना नोटीस देऊन त्यांना निलंबित करावे व आपल्या वक्तव्यावर त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली. विधुरी यांनी केलेल्या अपशब्दाचा उपयोग केल्याने देशभरात राजकारण पेटले आहे सर्वत्र त्यांच्यावर टिका होत आहे. संसदेचे पावित्र्य व गरिमा सांभाळणे सर्व सदस्यांचे कर्तव्य आहे.

यावेळी आरपिआयचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कदम, युवक अध्यक्ष पप्पू कागदे, शहराध्यक्ष नागराज गायकवाड , संजय ठोकळ आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow