दिल्लीगेट येथील आंदोलकांचा लाॅन्ग मार्च जाणार सरला बेटकडे...!

दिल्लीगेट येथील आंदोलकांचा लाॅन्ग मार्च जाणार सरला बेटकडे...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि.6(डि-24 न्यूज) मागिल 19 दिवसांपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मुस्लिम नुमायंदा कौन्सिलचे बेमुदत साखळी धरणे आंदोलन सुरू आहे. सरकारने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. आंदोलनाची दखल घेतली जात नाही. बाबा रामगिरी व नितेश राणे यांना अटक करा व विविध मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. दोघांवर अटकेची कारवाई होत नसल्याने 11 ऑक्टोबर, शुक्रवारी राज्यातील सर्व तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करुन प्रशासनाला निवेदन सादर करणार आहे. सरकार मागणीकडे दुर्लक्ष करून आमचा अंत बघू नये आता आम्ही अक्रामक होऊन रस्त्यावर उतरणार आहे. 18 ऑक्टोबर, शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) येथून लाखोंच्या संख्येने बाबा रामगिरी यांचे मठ सरला बेट येथे जाणार आणि त्यांनी जे वक्तव्य प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल काढले ते कसे खोटे वक्तव्य आहे ते समजावून सांगणार. लोकशाही मार्गाने व शांततेत हा मार्च सरला बेटकडे जाण्यासाठी राज्यभर जनजागृती करुन काढले जाणार आहे असा निर्णय राज्यस्तरीय समितीने बैठकीत घेतला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत मुस्लिम नुमायंदा कौन्सिलचे अध्यक्ष जियाऊद्दीन सिद्दीकी यांनी दिली आहे. याप्रसंगी राज्यातील कौन्सिलचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
काय आहे मागणी
बाबा रामगिरी व नितेश राणे यांना अटक करण्यात यावे. प्रेषित तथा विविध धर्माचे धर्मगुरुंवर विवादास्पद टिका टिप्पणी करणा-यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कठोर कायदा बनवावा. केंद्र सरकारने आणलेल्या वक्फ सुधारणा बील - 2024 रद्द करावे. औरंगाबाद नामांतराचा निर्णय मागे घेऊन शहरात दोन महानगरपालिका स्थापना करुन नवीन महानगरपालिकेला छत्रपती संभाजीनगर नाव देण्यात यावे.
याप्रसंगी राज्यातून आलेले मुस्लिम नुमायंदा कौन्सिलचे हाजी अथर हुसेन अशरफी, मौलाना रफीऊद्दीन अशरफी, हाफीज शेख रफीक मोहम्मद, काझी अफजलोद्दीन, नसीरोद्दीन फारुकी, सय्यद चांद, सय्यद अन्सार कादरी, सय्यद झुबेर, मोहम्मद इर्शाद, नाजिम खान, सय्यद मुबीन, सलिम चुडीवाले, मुजीब पटेल, अब्दुल समद, डॉ.मुजीब, तुफेल अहेमद नदवी, हाफिज मोहम्मद अनिस आदी उपस्थित होते.
D24NEWS English News....
Chhatrapati Sambhajinagar(Aurangabad),Oct 6 The indefinite chain dharna movement of the Muslim representative council is going on in front of the Divisional Commissioner's office for the last 19 days for their demand to arrest Baba Ramgiri and BJP MLA Nitesh Rane for their controversial statement about Prophet Mohammad.
Addressing a press conference on Sunday , President of Muslim Representative Council Ziauddin Siddiqui informed that the state level committee has taken a decision in the meeting that they will carried out march from here on October 18 in a democratic way and peacefully to go to Sarla island.
Before that , on October 11 they will protest at all tehsil offices in the state and submit a statement to the administration. The government should not ignore the demand and see our end,he said.
He alledged that ,the government has ignored our demand. The movement is not taken into account.
Officials and members of the council of the state were present on the occasion.
Our demands are Baba Ramgiri and Nitesh Rane should be arrested. A strict law should be made to take strict action against those who make controversial comments on the Prophet and religious leaders of various religions. The Waqf Amendment Bill - 2024 brought by the Central Government should be repealed. The decision to change the name of Aurangabad should be reversed and two Municipal Corporations should be established in the city and the new Municipal Corporation should be named Chhatrapati Sambhajinagar,he added.
Haji Athar Hussain Ashrafi, Maulana Rafiuddin Ashrafi, Hafiz Sheikh Rafique Mohammad, Qazi Afzaluddin, Naseeruddin Farooqui, Syed Chand among several others were present.
What's Your Reaction?






