मराठा आरक्षणाच्या निर्णयानिमित्त भाजपाने साजरा केला आनंदोत्सव...

मराठा आरक्षणाचे निर्णयाचे शहर भाजपा कडून जल्लोषात स्वागत
मराठा समाजासाठी मुख्यमंत्र्यांचे कायमच मोठे सकारात्मक निर्णय- किशोर शितोळे
मराठा समाजाला मुख्यमंत्री यांनी दिला मोठा दिलासा - किशोर शितोळे
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज) - शहर भाजपतर्फे आज क्रांती चौकातील शिवाजी महाराज पुतळा परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविल्याबद्दल भव्य जल्लोष साजरा करण्यात आला.
भाजपा शहर जिल्हाध्यक्ष किशोर दादा शितोळे यांच्या उपस्थितीत, ढोल-ताशांच्या गजरात व पेढे वाटून आनंदोत्सव पार पडला. या वेळी भाजप कार्यकर्त्यांसह इतर पक्षांचे कार्यकर्ते, मराठा आरक्षण चळवळीतील कार्यकर्ते व ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.
जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे म्हणाले, “आत्तापर्यंत अनेक मराठा मुख्यमंत्री झाले, पण मराठा समाजासाठी कायम सकारात्मक निर्णय केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच घेतले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला न्याय देत कालचा निर्णय अत्यंत कुशलतेने घेत, मराठा युवकांना विकासाच्या अधिक वाटा खुल्या केल्या आहेत."
यावेळी मराठा आरक्षण चळवळीतील उपस्थित कार्यकर्ते चंद्रकांत भराट, सुनील कोटकर, गणपत म्हस्के, मनोज गायके यांनि पेढे खाऊ घालून एकमेकांची गळाभेट घेतली, अभिनंदन केले.
या जल्लोषास मंत्री मा. अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवतजी कराड व आमदार संजय केणेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमात शहर सरचिटणीस रामेश्वर भादवे, हर्षवर्धन कराड, ताराचंद गायकवाड, छाया खाजेकर, महिला मोर्चा अध्यक्षा डॉ. उज्वला दहिफळे, युवा मोर्चा अध्यक्ष राहुल दांडगे, अनुसूचित मोर्चा अध्यक्ष सचिन मिसाळ, तसेच राज गौरव वानखेडे, जालिंदर शेंडगे, लक्ष्मण शिंदे, संजय चौधरी, सागर पाले, शालिनी बुंदे, सविता कुलकर्णी, जयश्रीताई किवळेकर, माधुरी अद्वंत, मीना मिसाळ, अमृता पालोदकर, मनीषा मुंढे, सुनीता साळूंखे, विजया भोसले, सुवर्णा तुपे, दिव्या मराठे, दिव्या पाटील, आरती गुटलकर, सुनिता औरादे, लक्ष्मी गायकवाड, अश्विनी गायकवाड, शिवगंगा जायभाय आदींसह विविध आघाडी, प्रकोष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?






