प्रभाग क्रमांक 14 मध्ये काँग्रेससाठी एमआयएमची माघार...? हबीब कुरैशी यांच्या समर्थकांचा जल्लोष...
प्रभाग 14 मध्ये काँग्रेससाठी एमआयएमची माघार, हबीब कुरैशी समर्थकांचा जल्लोष...!
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारासोबत आता थेट मुकाबला...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) - राष्ट्रवादी अजित पवार गटाने माघार घेतली नाही म्हणून प्रभाग क्रमांक 14 मधील ओबीसी महीला आरक्षित जागेतून काँग्रेसला बिनविरोध निवडून येण्याची संधी हुकली. एमआयएमच्या अधिकृत उमेदवार परवीन कैसर खान यांनी या प्रभागातून माघार घेतल्याने मलेका बेगम हबीब कुरैशी यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. परवीन कैसर खान या गेल्या महापालिका निवडणुकीत बुढीलेन उपचुनावमध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते यंदा एमआयएमने त्यांना उमेदवारी दिली होती. निवडणुकीपूर्वी काँग्रेससाठी एमआयएमने माघार घेतली अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे याचा परिणाम महापालिका निवडणुकीत होईल असे जाणकारांना वाटत आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख होती.
प्रभाग क्रमांक 14 ची अधिक चर्चा शहरात सुरू आहे. या प्रभागात आता दोन ओबीसी महीलांमध्ये थेट लढत आहे. या प्रभागात तीन महिलांनी तीन पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी एमआयएमच्या परवीन कैसर खान यांनी निवडणुकीत माघार घेतली. यामुळे आता या प्रवर्गातून काँग्रेसकडून कुरेशी मलिका बेगम आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रतिभा रविंद्र टाकळकर या दोघीच शिल्लक राहिलेल्या आहेत. येथे आता थेट लढत होणार आहे. परंतु आता येथे काँग्रेस मजबूत असल्याचे दिसून येत आहे दोन मुस्लिम महिला उमेदवारांमध्ये होणारे मतांचे विभाजन टाळण्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागली आहे.
तहसील कार्यालयात झोन क्रमांक 3 मधून 41 उमेदवारांनी माघार घेतली. यामध्ये 40 अपक्ष व एक एमआयएमच्या उमेदवाराने माघार घेतली. आता निवडणूक रिंगणात 91 उमेदवार शिल्लक असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व्यंकट राठोड यांनी दिली आहे.
या झोनमध्ये प्रभाग क्रमांक 6, 12, 13 व 14 चा समावेश आहे. चारही प्रभागात एकूण 175 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. छावणीमध्ये आठ जणांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरल्यानंतर 167 अर्ज शिल्लक होते. आज दुपारी तीन वाजेपर्यंत 41 जणांनी रिंगणातून माघार घेतली. आता निवडणूक रिंगणात 91 उमेदवार शिल्लक राहिले आहे. प्रभाग क्रमांक 13 मधून सर्वाधिक जणांनी माघार घेतली. प्रभाग क्रमांक 14 मधून 9 तर प्रभाग क्रमांक 6 मधून 8, प्रभाग क्रमांक 12 मधून 8 उमेदवारांनी माघार घेतली आहे.
आता प्रभाग क्रमांक 6 मधून 26, 12 मधून 17, 13 मधून 28, 14 मधून 28, 14 मधून 20 उमेदवारांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक 13 ड मधून सर्वसाधारण प्रवर्गात सर्वाधिक 9 उमेदवार आहेत तर सर्वात कमी प्रभाग क्रमांक 14 अ मध्ये ओबीसी महिला प्रवर्गात 2 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
प्रभाग क्रमांक 3,4,5 मध्ये 31 उमेदवारांनी माघार घेतली आता 102 उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 15,16,17 मध्ये 74 उमेदवारांनी माघार घेतली तर आता 88 उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 6,12,13,14 मध्ये 41 उमेदवारांनी माघार घेतली आता 91 उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 1,2,7 मध्ये 50 उमेदवारांनी माघार घेतली तर आता 93 उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 8, 9,10,11 मध्ये 73 उमेदवारांनी माघार घेतली आता 107 उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 23,24,25 मध्ये 58 उमेदवारांनी माघार घेतली तर आता 98 उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 21,22,27 मध्ये 91 उमेदवारांनी माघार घेतली. प्रभाग क्रमांक 26,28,29 मध्ये 72 उमेदवारांनी माघार घेतली आता 124 उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 18,19,20 मध्ये 64 उमेदवारांनी माघार घेतली आहे. आता 71 उमेदवार रिंगणात आहेत. 29 प्रभागात एकूण 859 उमेदवार रिंगणात आहेत.
What's Your Reaction?