भारतीय एकता पार्टी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार - खलील चौधरी
 
                                विधानसभा निवडणुकीत उमेदवार देणार भारतीय एकता पार्टी - खलील चौधरी
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.27( डि-24 न्यूज) आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागेमधून ज्यांनी उमेदवारी मागितली त्यांना नकी भारतीय एकता पार्टी उमेदवारी देणार आहे. राज्यात पक्षाची बांधणी करणार, राज्य कार्यकारिणी लवकरच घोषित केले जाईल. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पक्षाच्या वतीने आंदोलन केले जाईल. शहरातील विविध नागरी समस्या, नवीन नकाशा व पाण्याची समस्या, आरोग्य, रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. पक्षाचे ध्येय धोरण लक्षात घेता एमआयएम व अन्य पक्षांशी युती करण्यासाठी विविध निवडणुकीत भविष्यात विचार केला जाईल. सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार. नागरीकांनी पक्षात प्रवेश करुन आपल्या न्याय हक्कासाठी लढावे अशी माहिती पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष खलील चौधरी यांनी दिली आहे. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्रभारी तथा महासचिव शेख हबीब यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            