शहराचा बदललेला चेहरा पाहून समाधान वाटले - अभिनेत्री श्रेया बुगडे
शहराचा बदलेला चेहरा पाहून समाधान वाटले :- अभिनेत्री श्रेया बुगडे
मंत्री श्री अतुल सावे यांच्या वतीने नमो दहीहंडीचे आयोजन
छ. संभाजीनगर(औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज) तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाने भरलेला दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली पूर्व मतदार संघात आयोजित करण्यात आलेल्या नमो दहीहंडी निमित्त गोविंदा पथकांनी एकापेक्षा एक कला सादर करत नागरिकांचा उत्साह वाढवला. यावेळी मराठी अभिनेत्री श्रेया बुगडे आणि शिवानी सोनार यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना अभिनेत्री श्रेया बुगडे हिने आपल्या भावना व्यक्त करतांना म्हणाली की, कामानिमित्त अनेक वेळा शहरात येणे होत होते. मात्र आज मंत्री श्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली शहराचा बदलेला चेहरा पाहून खूप समाधान वाटत असल्याचे श्रेया ने सांगितले..तसेच त्याच्या माध्यमातून होते असलेले विकास काम मन भारावून गेले असल्याचे देखील तिने सांगितले. तसेच तिने झिंगाट या मराठी गाण्यावर ठेका धरत उपस्थितांची मने जिंकली.
ढाक्कुमाक्कुम ढाक्कुमाक्कुम, गोविंदा रे गोपाळा, मच गया शोर सारी नगरी रे या गाण्यांवर दहीहंडीप्रेमी मानवी मनोऱ्यांचा रोमहर्षक थरार अनुभवला. यंदाचे हे 11 वे वर्ष असून पूर्व मतदार संघातील गारखेडा आणि सिडको येथील बजरंग चौक परिसरात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
लाखो रुपयांचे पारितोषिक असलेली उंचच उंच दहीहंडी बांधण्यात आली होती. तर त्यांना फोडण्यासाठी दहीहंडी पथकांमध्ये चुरस पाहायला मिळाली. गो गो गो गोविंदा… गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा, हाथी घोडा पालकी जय काहैय्या लाल की, अशा जय घोषणे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. हा रोमहर्षक सोहळा मंगळवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी युवा उद्योजक अजिंक्य सावे, अनुराग सावे, गोविंद केंद्रे, शिवाजी दांडगे, दामू अण्णा शिंदे, बालाजी मुंडे, माधुरी अदवंत, लक्ष्मीकांत थेठे, मंगलमूर्ती शास्त्री, गणेश नावंदर, नितीन खरात, रामचंद्र जाधव, विवेक राठोड, अमेय देशमुख, विशाल खंडागळे, रामचंद्र दसपुते, शैलेश हेकाडे, यांच्या सह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच नागरिकांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?