विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतली पाडसवान कुटुंबाची भेट...

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतली पाडसवान कुटुंबांची भेट...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज) -: राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज जागेच्या कब्जेवरून हत्या करण्यात आलेल्या प्रमोद रमेश पाडसवान कुटुंबियांची भेट घेतली. कुटुंबियांची सांत्वन पर भेट घेऊन कायदेशीर प्रक्रियेद्वारे तुम्हाला न्याय मिळवून देऊ असा विश्वास दानवे यांनी कुटुंबीयांना दिला.
आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेत त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास दिला. आरोपींना कोणीही वाचविण्याचा प्रयत्न करणार नाही. या कठीण प्रसंगात शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह वैयक्तिकरित्या मी सोबत असल्याचे अंबादास दानवे यांनी ठाम पणे सांगितले.
याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, महानगर प्रमुख राजू वैद्य व शहरप्रमुख दिग्विजय शेरखाने व ज्ञानेश्वर डांगे उपस्थित होते.
What's Your Reaction?






