शहरात जोरदार चर्चा एका अपक्ष उमेदवाराच्या अनोख्या प्रचाराची
शहरात जोरदार चर्चा एका अपक्ष उमेदवाराच्या अनोख्या प्रचाराची
औरंगाबाद, दि.11(प्रतिनिधी) 5 नोव्हेंबर पासून राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा धुराळा सुरू झाला. ढोल ताशांच्या गजरात विविध पक्षांच्या उमेदवारांचे प्रचाराला फटाक्यांची आतषबाजी, कार्यकर्त्यांना खानावळी, ओल्या व सुक्या पार्टी, मोठमोठ्या नेत्यांचे भव्य दिव्य व्यासपीठ, लायटींग, झेंडे, मोठ मोठे फुल हार करण्यात उमेदवार आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी मग्न आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत परंतु शहरात एक उमेदवार असा आहे ना झेंडा, ना पक्ष, ना संघटना, ना ढोल ताशे, ना नेता, फक्त आणि फक्त औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात विकासाची तळमळ, युवा, उच्चशिक्षित, सर्व धर्माचा सन्मान करणारा, आदर्शवादी व धर्मनिरपेक्ष विचारधारा, तळागाळातील प्रश्नांची जाण असणारा, सर्व भाषेवर प्रभुत्व असणारा, छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, मौलाना आझाद यांच्या आदर्शांना पुढे नेणारा, सामाजिक न्याय, बंधूत्व आत्मसात करणारा, दिलेले आश्वासन पाळणारा, दोन वर्षांपासून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असलेले 24 तास जनतेच्या संपर्कात असलेले समाजसेवक हिशाम उस्मानी यांचे नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार सुरू आहे. त्यांच्या एका समर्थकाने सांगितले या विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांविरुध्द नाराजी आहे. या मतदारसंघात जनतेला बदल हवा चेहरा नवा म्हणून उस्मानी यांना जनतेचे समर्थन मिळत आहे. अवाढव्य खर्च नाही, कार्यकर्त्यांची फौज सोबत नाही परंतु एक एक मतदाताची भेट घेऊन आपण काय काम करणार आहे. कशाला त्यांना मत द्यायचे आहे. साधे राहणीमान, हातात फक्त एक पाॅम्पलेट, पायात साधी चप्पल, पाॅम्पलेट मध्ये जाहिरनामा आहे. कोणत्याही पक्षावर टिका टिप्पणी नाहीं. म्हणून या उमेदवाराला पसंती मिळत आहे. शहरातील सर्वच वार्ड ते पायी फिरून पिंजून काढत आहे. कोणताही वार्ड ते प्रचाराविना सोडत नसल्याने महीला, युवा, जेष्ठ नागरिक त्यांना आशिर्वाद देत आहे. जेव्हा ते प्रचारासाठी सकाळी घराबाहेर सोबत त्यांच्यासोबत मिडीयाचा तामझाम नसतो. नामांकित वर्तमानपत्रात बातम्या फोटो नसतात. माऊथ पब्लिसिटीवर व सोशल मीडियावर त्यांचा जास्त जोर दिसून येत आहे. अंगूरीबाग, मोतीकारंजा, लोटाकारंजा, कुतुबपुरा, अरब खिडकी, न्यू कुतुबपुरा, विद्यापीठ परिसर, पवनचक्की परिसर, बुढीलेन या परिसरात डोअर टु डोअर प्रचार दौरा करत असताना आमच्या प्रतिनिधीने बघितले हे वास्तव समोर आले. अन्य उमेदवार लाखो रुपये प्रचारासाठी खर्च करत आहे परंतु उस्मानी यांच्या नियोजनबद्ध प्रचाराची जोरदार चर्चा शहरात होत आहे. त्यांच्या सोबत फक्त मोजकेच कार्यकर्ते व स्थानिक लोक जुळताना दिसत आहे. यावेळी अब्दुल समद, शेख सोहेल, सय्यद अहेमद, शेख मोहसीन लकी, नईम उल हक, संजय वाघमारे, राहुल जाधव, नजीर फारुकी, सय्यद हमीद आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?