मार्च 2024 पर्यंत शहर वासियांना एक दिवसाआड पाणी पुरवठा - डॉ.भागवत कराड
मार्च 2024 पर्यंत शहर वासियांना एक दिवसाआड पाणी पुरवठा - डॉ.भागवत कराड
औरंगाबाद, दि.23(डि-24 न्यूज) शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. 9 दिवसाआड नळाला पाणी येत असल्याने उन्हाळा लागण्याच्या अगोदर टंचाई निर्माण होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. शहरात सध्या पिण्याच्या नवीन पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. जुनी पाइपलाइनच्या बाजूला नवीन योजनेचे पाईप टाकण्याचे काम मनपाने जीवन प्राधिकरणने हे काम हातात घेतले आहे. या योजनेचे काम फेब्रुवारी अखेरीस पूर्ण होऊन मार्च महिन्यापासून शहरवासीयांना एक दिवसाआड पिण्याचे पाणी पुरवठा होईल असा दावा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी केला आहे.
डॉ.कराड यांनी नवीन पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना हि माहिती दिली.
पैठण जायकवाडी धरणात सध्या 40 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. शहरातील जुनी पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन जर्जर झाली आहे. म्हणून शासनाने 1680 कोटीची योजना जाहीर केली होती आता या योजनेच्या निधीत वाढ झाली आहे. डॉ.कराड यांनी या गंभीर विषयावर आठ ते दहा बैठका घेऊन काम गतीने सुरू होण्यास मदत झाली. जुनी 100 ते 56 एमएलडी पाण्याची पाइपलाइन जर्जर झालेली असल्याने पाणी गळतीचे प्रमाण खूप वाढत आहे. म्हणून नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम युध्दपातळीवर जलद गतीने सुरू करण्यात आले आहे.
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी या नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली होती पण सत्ता परिवर्तन झाले त्यावेळी कोरोना काळात या योजनेला ब्रेक लागला होता. दिड वर्ष ठाकरे सरकारच्या काळात वेळ वाया गेला म्हणून हि योजना 1780 कोटींहून 2780 कोटी पर्यंत गेली. एक हजार कोटी जास्त निधी लागणार आहे. आता नवीन पाणीपुरवठा योजनेला गती आल्याने मार्च 2024 पर्यंत शहर वासियांना एक दिवसाआड पाणी पुरवठा होईल असा दावा कराड यांनी केला आहे.
What's Your Reaction?