ओसामाची युवकांमध्ये वाढली क्रेझ...!
ओसामाची युवकांमध्ये क्रेझ...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) - कोरोनाकाळापासून रुग्णांच्या मदतीला धावून जाणारे ओसामा अब्दुल कदिर नवीन नेतृत्व प्रकाशझोतात आले. त्यानंतर नगरसेवक नसताना नशा मुक्तीसाठी काम करत असताना एक नंबर स्कुल बारी काॅलनी येथील महापालिकेच्या विरान झालेल्या इमारतीचा वापर नशा करण्यासाठी होत त्या इमारतींची दुरुस्ती करुन शाळेचे कायापालट करण्यासाठी योगदान दिले व मैदानावर टर्फ मैदानाचे विकास नवखेळाडूंना तयार करण्यासाठी मनपाच्या माध्यमातून तयार केल्याने युवकांमध्ये त्यांची आणखी क्रेझ वाढली. सोशलमिडीयावर त्यांच्या चाहत्यांची संख्या वाढत गेली. त्यांनी सूचित केलेल्या विकासकामे महापालिका प्रशासनाने टाळली नाही हा इतिहास आहे. त्यांना महापालिका निवडणुकीत एमआयएमने प्रभाग क्रमांक 13 मधून उमेदवारी देवून नगरसेवक बनण्याची संधी दिली यामुळे त्यांची अधिक लोकप्रियता वाढली असल्याचे दिसत आहे.
प्रचाराला अजून सुरुवात झाली नाही तरीही त्यांच्या प्रचार कार्यालयात युवकांची गर्दी होत आहे. त्यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांचे स्वागत करण्यासाठी प्रभागातील जनता व शहरातील लोक शुभेच्छा देण्यासाठी भेट घेत आहे. त्यांनीही प्रभागात भेटीगाठी सुरू केल्या आहेत. एमआयएमने पदवीधर उच्चशिक्षित व युवा नेतृत्वाला तिकीट दिल्याने अधिक उत्साह प्रभागात दिसून येत आहे. प्रभागातून ते निवडून आले तर नक्की ते विकासाच्या माध्यमातून नागरिकांना संतुष्ट करतील असा आत्मविश्वास येथील मतदारांमध्ये आहे असे एका कार्यकर्त्याने सांगितले. युवा, महीला, जेष्ठ नागरिक यांच्यासाठी प्रभागातील नवीन विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार असल्याची चर्चा आहे. एवढी वर्षे ओसामांनी केलेले सामाजिक कार्याने येथील जनता प्रभावीत आहे असे चित्र त्यांच्या लोकप्रियतेमुळे दिसून येत आहे.
What's Your Reaction?